जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

World Cup : श्रीलंकेविरोधात बुमराह खेळण्याची शक्यता कमी, कोण घेणार जागा?

बुमराहनं आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 7 सामन्यात त्यानं 14 विकेट घेतल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं शानदान कामगिरी केली आहे. बांगलादेशला नमवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेल्या भारतीय संघाचा आता लीग स्टेजमधील एक सामना शिल्लक आहे. शनिवारी भारतीय संघ श्रीलंकेविरोधात भिडणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. मात्र, या सामन्यात भारतीय संघ मोठे बदल करू शकतो. काही प्रमुख खेळाडूंना या सामन्यात विश्रांती मिळू शकते. बुमराहला मिळणार आराम भारतीय संघाचा हुकुमी एक्का मानला जाणारा जसप्रीत बुमराह सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या यॉर्करच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तान आणि बांगलादेशवर विजय मिळवला होता. मात्र बुमराह वर्षभर सतत क्रिकेट खेळत असल्यामुळं त्याला श्रीलंकेविरोधात विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे बुमराहला नको आहे आराम बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यानंतर बुमराहला आरामाबाबत विचारले असता त्याने विश्रांती घेण्यास नकार दिला होता. तो म्हणाला की, “हा माझा पहिला वर्ल्ड कप आहे. त्यामुळं जास्तीत जास्त खेळण्यास मी उत्सुक आहे. त्यामुळं मला आरामाची गरज नाही”. वर्ल्ड कपमध्ये बुमराहची चलती वर्ल्ड कपमध्ये बुमराह सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या यॉर्करनं चांगल्या चांगल्या फलंदाजांची झोप उडवली आहे. अफगाणिस्तानविरोधात बुमराहनं 19 यॉर्कर टाकले होते. आतापर्यंत 7 सामन्यात त्यानं 14 विकेट घेतल्या आहेत. बुमराहच्या जागी कोणाला मिळणार संधी श्रीलंकेविरोधात जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्यास भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. बांगलादेशविरोधात तीन जलद गोलंदाज खेळले होते. त्यामुळं श्रीलंकेविरोधात बुमराह खेळणार नसल्यास संघात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. वाचा- पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला वाचा- ‘अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे’, रोहितनं घेतली चहलची फिरकी वाचा- World Cup : इंग्लंडमध्ये सुरक्षित नाही भारतीय संघ, ICCने केले हात वर VIDEO: अर्थसंकल्प ते क्रिडा क्षेत्रापर्यंतच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात