जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup : 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

World Cup : 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

World Cup : 'अरे तुझ्या तोंडापेक्षा बूट मोठा आहे', रोहितनं घेतली चहलची फिरकी

ICC Cricket World Cup : चहलच्या फोटोवरची रोहितची कमेंटसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 05 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघानं आतापर्यंत शानदान कामगिरी केली आहे. त्यामुळं विराटच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या भारतीय संघानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचे आतापर्यंत 8 सामने झाले आहेत, यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे तर, एका सामन्यात इंग्लंडनं भारताला पराभूत केले आहे. शनिवारी भारत लीग स्टेजमधला आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरोधात खेळणार आहे. त्याचदिवशी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे, त्यामुळं शनिवारी सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होईल. बांगालदेशविरोधात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय संघ सध्या विश्रांती घेताना दिसत आहे. टीम इंडिया संध्या लीड्समध्ये आपला वेळ घालवत आहेत. यातच सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो भारताला फिरकीपटू युजवेंद्र चहलचा असून, रोहितनं यावर एक मजेशीर कमेंट करत त्याची फिरकी घेतली आहे. चहलच्या फोटोवर रोहितनं, “तुझ्या तोंडापेक्षा बुट मोठे आहेत”, अशी मिश्किल कमेंट केली आहे.

News18

युजवेंद्र चहलनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एका ब्रॅण्डच्या कपड्यांच्या जाहीरातीकरिता केलेल्या फोटोशुटचा फोटो टाकला होता. मात्र यावर रोहितची मजेशीर कमेंट चाहत्यांमध्ये व्हायरल झाली आहे. चहलही रोहितच्या फोटोवर अशा मजेशीर कमेंट करत असतो. चहलनं वर्ल्ड कपमध्ये 7 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. मात्र चहलच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त षटकार देण्याचा लाजीरवाणा विक्रम आहे. चहलनं आतापर्यंत 13 षटकार दिले आहेत. तर, रोहित शर्मा वर्ल्ड कपमधला सध्या सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं एकूण 4 शतक लगावले आहेत. रोहितनं 90च्या स्ट्राईक रेटनं 544 धावा केल्या आहेत. वाचा- World Cup : अफगिणस्तानच्या इकरामनं मोडला सचिनचा विश्वविक्रम! वाचा- World Cup : युनिव्हर्सल बॉसचं अनोखं सेलिब्रेशन, चाहत्यांनी वाजल्या शिट्ट्या! वाचा- World Cup : धोनीच्या अंगठ्याला दुखापत, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? VIDEO: अर्थसंकल्प ते क्रिडा क्षेत्रापर्यंतच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात