जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / World Cup : पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

World Cup : पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

World Cup : पाकचा कर्णधार बावळट त्यात संघ भित्रा, शोएब अख्तर पुन्हा भडकला

World Cupमध्ये सुरुवातीच्या सामन्यात केलेल्या खराब कामगिरीमुळं पाकिस्तान संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 05 जून : ICC Cricket World Cupमध्ये सुरुवातीच्या सामन्यात केलेल्या खराब कामगिरीमुळं पाकिस्तान संघाचे सेमीफायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाच्या विजयानं पाकिस्तानच्या आशा मावळल्या आहेत. दरम्यान आज बांगलादेशविरोधात होणाऱ्या शेवटच्या सामन्यात पाक संघाला मोठ्या धावसंख्येने हा सामना जिंकावा लागणार आहे. यामुळं पाक संघावर चाहते टीका करत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरनं सरफराज अहमदच्या संघाला भित्रा संघ म्हणत टीका केली आहे. शोएबनं आपल्या युट्युब व्हिडिओमधून, “या अळा भित्र्या संघासोबत आपण पुढे खेळू शकत नाहीत. जर तुम्हाला पुढे जिंकायचे असेल तर चांगला संघ हवा. हा असा पाकिस्तान संघ कधीच नव्हता”, अशा शब्दात टीका केली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर सफराजवर केली होती टीका असे पहिल्यांदा झाले नाही आहे की, शोएब अख्तरनं पाकच्या संघावर टीका केली आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर शोएबनं सर्फराजला बावळट म्हटले होते. पाकचे संघ व्यवस्थापन घराब असल्यामुळं त्याचा फटका संघाला बसत आहे, असेही मत शोएबनं व्यक्त केले होते.

संघव्यवस्थापनेवरही केली होती टीका शोएबनं, “आमची मॅनेजमेंट बावळट आहे. त्यांनी आमच्या कर्णधाराला मामू बनवले आहे. त्याला काहीच समजत नाही. तो काहीच करू शकत नाही”, अशी टीका केली होती. वेस्ट इंडिजनं बिघडवला पाकिस्तानचा खेळ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे प्रदर्शन वाईट राहिले आहे. पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा फटका बसला होता. वेस्ट इंडिजनं 7 विकेटनं पाकला नमवले होते. पाकिस्तानचा संघ केवळ 105 धावात बाद झाला होता. त्यामुळं पाकिस्तानचा रनरेट मायन्समध्ये गेला. त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला. तर, श्रीलंकेच्या संघाविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. VIDEO: अर्थसंकल्प ते क्रिडा क्षेत्रापर्यंतच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात