मॅंचेस्टर, 09 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये आज सेमीफायनलमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार आहे. हा सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर होणार आहे. याच मैदानावर भारतानं पाकिस्तान आणि वेस्टइंडिजला पराभूत केले होते. दरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात साखळी सामन्यातील सामना पावसामुळं रद्द झाला होता. या सामन्यावर साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे, कारण हा सामना नॉक आऊट आहे. त्यामुळं कोणते अकरा खेळाडू आज भारताकडून खेळणार हे जास्त महत्त्वाचे आहे. श्रीलंकेविरोधात झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतानं रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी दिली होती. मात्र आजच्या सामन्यात प्लेयिंग इलेव्हनमध्ये मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळू शकते. दरम्यान जडेजाचे स्थान संघात कायम असू शकते, त्याच्या जागी भुवनेश्वर कुमारला बाहेर बसवावे लागले. म्हणून जडेजाला मिळणार संधी न्यूझीलंड विरोधात जडेजाला संधी मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे श्रीलंकेविरोधात त्यानं चांगली कामगिरी केली होती. जडेजा गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यातही कमाल कामगिरी करू शकतो. त्यामुळं भुवनेश्वर कुमारच्या जागी जडेजाला संधी मिळू शकते. वाचा- World Cup: कोण जिंकणार? भारत, न्यूझीलंड की पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज! रोहित शर्मा विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या. रोहित या विक्रमाच्या अतिशय जवळ पोहोचला आहे. रोहितने 647 धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी रोहितला केवळ 27 धावांची गरज आहे. न्यूझीलंडविरुद्ध रोहितला हा विक्रम करण्याची संधी आहे. असे झाल्यास एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याचे नाव घेतले जाईल. वाचा- World Cup सेमीफायनलसाठी भारताला मिळाला अलर्ट; घ्यावी लागणार ‘ही’ काळजी! इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आणखी एक विक्रम रोहितला खुणावत आहे. इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी खेळाडू होण्याचा मान रोहितला मिळू शकतो. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. पॉन्टिंगने इंग्लंडमध्ये सर्वधिक 1 हजार 387 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला केवळ 54 धावांची गरज आहे. रोहितने इंग्लंडमध्ये 70च्या सरासरीने 1 हजार 334 धावा केल्या आहेत. असा असेल भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. वाचा- World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा ! भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.