जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup सेमीफायनलसाठी भारताला मिळाला अलर्ट; घ्यावी लागणार 'ही' काळजी!

World Cup सेमीफायनलसाठी भारताला मिळाला अलर्ट; घ्यावी लागणार 'ही' काळजी!

India's captain Virat Kohli, second left, and teammates leave the field after their win over Bangladesh in the Cricket World Cup match at Edgbaston in Birmingham, England, Tuesday, July 2, 2019. (AP Photo/Aijaz Rahi)

India's captain Virat Kohli, second left, and teammates leave the field after their win over Bangladesh in the Cricket World Cup match at Edgbaston in Birmingham, England, Tuesday, July 2, 2019. (AP Photo/Aijaz Rahi)

ICC Cricket World Cupममध्ये आज (9 जुलै) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलची लढत होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 09 जुलै: ICC Cricket World Cupमध्ये आज (9 जुलै) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलची लढत होणार आहे. दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात एक चूक वर्ल्ड विजेतेपदाचे स्वप्न भंग करु शकते. सेमीफायनलसारख्या लढतीत फॉर्म, इतिहासातील कामगिरी या घटकांचा कोणताही फरक पडत नाही. तर एकच घटक महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे त्या दिवशी संबंधित संघातील खेळाडू कशी कामगिरी करतात. वर्ल्ड कप स्पर्धेत सेमीफानयल सामन्यात दबाव कशा पद्धतीने हाताळला जातो यावर निकाल ठरतो. याशिवाय अन्य एक घटक आहे जो दोन्ही संघांचे फायनलचे तिकिट निश्चित करणार आहे. एक घटक ठरवणार फायनलचे तिकीट… वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंतच्या सामन्यात खेळपट्टी ही पहिल्या डावात वेगवान असल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या डावात ती अधिक धिमी होते. त्यामुळेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघात फायदा होता. त्यानंतर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला अधिक अवघड होते. मॅनचेस्टर येथे होणाऱ्या सामन्यात देखील खेळपट्टी ही महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या सामन्यासाठी नव्या खेळपट्टीचा वापर केला जाणार आहे आणि ही खेळपट्टी भारतासाठी धोकादायक ठरू शकते. मॅचेस्टरमधील खेळपट्टीवर चेंडू सुरुवातीलाच स्विंग अधिक होतो. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्याचे कौशल्य चांगलेच माहित आहे. ट्रेंट बोल्ट सारखा गोलंदाज भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. मॅचेस्टरमध्ये ठगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे चेंडू अधिक स्विंग होईल. सुरुवातीच्या षटकात चेंडू अधिक स्विंग होणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांना या स्विंगला सामोरे जावे लागणार आहे. न्यूझीलंडने सुरुवातीलाच भारताला धक्के दिले तर मोठी धावसंख्या उभी करता येणार नाही. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने भारताविरुद्ध अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. बोल्टने भारताविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. बोल्ट जगातील सर्वोत्तम गोलंदाज नसला तरी वनडे सर्वात वेगाने 150 विकेट घेणारा गोलंदाजाच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. CCTV VIDEO : धावत्या लोकलमधून उतरण्याचा प्रयत्न प्रवशाच्या जीवावर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात