जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा ! काय आहे सट्टेबाजाराचा अंदाज?

World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा ! काय आहे सट्टेबाजाराचा अंदाज?

World Cup: भारत – न्यूझीलंड मॅचवर 1500 कोटींची सट्टा ! काय आहे सट्टेबाजाराचा अंदाज?

World Cupमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड अशी सेमी फायनल होणार असून त्यावर आता करोडोंचा सट्टा लागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मँचेस्टर, 09 जुलै : भारत विरूद्ध न्यूझीलंड ! वर्ल्डकपमधील पहिली सेमी फायनल आज रंगणार असून या दोघांपैकी फायनलमध्ये कोण प्रवेश करणार? यावर आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. मँचेस्टरच्या मैदानावर रंगणाऱ्या सामन्याकडे आता जगातील क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिलं आहे. मँचेस्टरची मॅच भारत जिंकणार की न्यूझीलंड यावर आता 1500 कोटींची सट्टा देखील लागला आहे. ऑनलाईन अ‍ॅप, बेटींग अकाऊंटच्या मदतीनं हा सट्टा खेळला जात आहे. टीम इंडिया सट्टेबाजांची फेवरेट टीम असली तरी, न्यूझीलंडला देखील सट्टे बाजार कमी लेखत नाहीत. सट्टे बाजारात भारताचा भाव 38 पैसे आणि न्यूझीलंडचा भाव 40 पैसे आहे. भारत ही सट्टेबाजांची फेवरेट टीम असली तरी, न्यूझीलंडचा भाव मात्र चढा आहे. हायहोल्टेज मॅच दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. World Cup: हिटमॅन रोहित विश्व विक्रमाच्या उंबरठ्यावर; आज मोडणार हे 3 विक्रम! भारताच्या स्कोअरवर लक्ष भारतानं पहिली बॅटींग केल्यास 300 ते 350चा स्कोर केला जाईल असा सट्टाबाजाराचा अंदाज आहे. यावर 90 पैसे असा भाव लागला आहे. तर, 250 ते 300 रन्सवर 1 रूपये 30 पैसे भाव आहे. न्यूझीलंडच्या बॅटींगचा काय भाव? न्यूझीलंडनं पहिली बॅटींग केल्यास 300 ते 350पर्यंत स्कोअर होईल असा अंदाज आहे. त्यावर 1 रूपया 80 पैसे भाव लागला आहे. म्हणजेच भारतापेक्षा 50 पैसे जास्त हे न्यूझीलंडच्या स्कोअरवर लागले आहेत. रोहित शर्मांच्या शतकावर देखील सट्टा दरम्यान, फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माच्या शतकावर देखील सट्टा लागला आहे. रोहित शर्माच्या शतकावर 20 पैसे भाव लागला आहे. तर, विराट कोहलीवर 42 पैसे इतका भाव लागला आहे. सट्टेबाजांना विराट कोहली शतक झळकवेल असा ठाम विश्वास आहे. तर, धावांचा पाठलाग करताना विराट कोहली शतक ठोकणार यावर मात्र सट्टेबाजांना ठाम विश्वास आहे. भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात