News18 Lokmat

World Cup: कोण जिंकणार? भारत, न्यूझीलंड की पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज!

वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलमध्ये होणारा हा पहिलाच सामना आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 01:12 PM IST

World Cup: कोण जिंकणार? भारत, न्यूझीलंड की पाऊस; वाचा हवामान खात्याचा अंदाज!

मँचेस्टर, 09 जुलै: ICC Cricket World Cupच्या अंतिम टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. अखेरच्या तीन सामन्यात वर्ल्ड कपचा विजेता ठरणार आहे. मंगळवारी बाद फेरीतील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. कारण आज फायनलचा एक संघ निश्चित होणार आहे. या दोन्ही संघातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे स्पर्धेत हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येत आहेत. विशेष म्हणजे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलमध्ये होणारा हा पहिलाच सामना आहे.

जडेजा की भुवनेश्वर कोणाला देणार विराट संघात जागा? अशी असेल प्लेयिंग इलेव्हन

दोन्ही संघा दरम्यान साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आज देखील पुन्हा पावसाची बॅटिंग होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. अर्थात पावसामुळे आजचा खेळ रद्द झाला तर उद्याचा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर दोन्ही दिवस पावसामुळे सामनाच रद्द करावा लागला तर सरासरीच्या जोरावर भारत अंतिम फेरीत प्रवेश करेल. पण ही गोष्ट चाहत्यांसाठी आणि क्रिकेट प्रेमींसाठी नक्कीच ठरणार नाही. दोन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार मानले जातात. त्यामुळे या दोघांमधील मैदानावरील लढत पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

World Cup सेमीफायनलसाठी भारताला मिळाला अलर्ट; घ्यावी लागणार 'ही' काळजी!

पाऊस पडेल का?

Loading...

ब्रिटिश हवामान विभागानुसार आज मँचेस्टरमध्ये पावसाची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असेल आणि अधून मधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजल्यापासून 50 टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. याचाच अर्थ नाणेफेक होण्यास उशिर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. शहरातील कमाल तापमान 20 डिग्री असेल असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.

अशी आहे सट्टेबाजाराची भविष्यवाणी; भारत आणि रोहित शर्मावर लागलाय इतका भाव!

राखीव दिवशी होणार मुसळधार पाऊस...

आज पावसामुळे जर सामना झाला नाही तर उद्या बुधवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण हवामान खात्यानुसार राखीव दिवशी बुधवारच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता आहे.

भारताच्या विजयासाठी क्रिकेटप्रेमींकडून प्रार्थना, यासोबत इतर 18 घडामोडींचा आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...