यंदाच्या ICC Cricket World Cupच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

यंदाच्या ICC Cricket World Cupच्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

यंदाच्या विश्वचषकाच्या या काही खास गोष्टी आणि नियम जाणुन घेणे क्रिकेटप्रेमींसाठी गरजेचे आहे.

  • Share this:

लंडन, 26 मे : आयसीसी विश्वचषकाला आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक असताना, सर्व संघांनी जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यंदा एका विश्वचषकासाठी दहा संघ एकमेकांविरोधात भिडणार आहेत. यात जगज्जेते संघ म्हणजे भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा तर, आपला पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक असलेले साऊथ आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान सामिल झाले आहेत. यंदाचा विश्वचषक हा राऊंड रॉबिन पध्दतीनं खेळवला जाणार आहे. अश्या काही खास गोष्टी यंदाच्या विश्वचषकाच्या जाणुन घेणे क्रिकेटप्रेमींसाठी गरजेचे आहे.

27 वर्षांनंतर राऊंड रॉबीन पध्दत

1992च्या विश्वचषकात पहिल्यांदा वापरल्या गेलेल्या राऊंड रॉबीन पध्दतीचा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 27 वर्षांनी वापर केला जाणार आहे. यामुळं कोणतेही गट असणार नाहीत. सर्व संघ एकमेकाविरोधात भिडणार आहे. त्यामुळं यंदा ही स्पर्धा 46 दिवस चालणार आहे. त्यात 12 मैदानांवर 48 सामने खेळले जाणार आहेत.

दहा संघ असतील स्पर्धेत सामिल

यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदा दहा संघ खेळवण्यात आले आहेत. 1975, 1983 आणि 1987मध्ये 8 संघ सामिल झाले होते. तर, 2007मध्ये सर्वात जास्त म्हणजे 19 संघ खेळले होते. तर, 2011 आणि 2015मध्ये 14 संघ भिडले होते.

असे निवडले जाणार टॉप 4 संघ

यंदाच्या विश्वचषकात ज्या संघानं सर्वात जास्त लीग सामने जिंकले असतील ते चार संघ टॉप 4वर असतील. जर, दोन संघांचे गुण समान असतील तर, त्यांचा रेनरेट गृहीत धरला जाणार आहे. जर रनरेचही समान असले तर, त्या दोन संघांच्या सामन्यातील निर्णयावर त्या संघाला स्थान देण्यात येईल. त्यामुळे सर्व संघांना प्रत्येक सामन्यात चांगल्या रनरेटनं जिंकणे महत्त्वाचे असणार आहे.

आयपीएलप्रमाणे विश्वचषकातही सुपर ओव्हर

विश्वचषकात यंदा पहिल्यांदा सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळणार आहे. मात्र हे केवळ सेमी फायनल आणि फायनलसाठी असेल. या दोन सामन्यांदरम्यान मॅच टाय झाली तरच सुपर ओव्हर होणार आहे. सुपर ओव्हरचा नियम 2011मध्येही लागू करण्यात आला होता. मात्र 2015च्या विश्वचषकात हा नियम हटवण्यात आला होता.

वाचा-World Cup : भगव्या रंगाच्या जर्सीत खेळणार विराटसेना ?

वाचा-फक्त खेळाडूच नाही तर 'या' पाच हॉट अ‍ॅंकरही गाजवणार ICC Cricket World Cup

वाचा-अर्जुन तेंडुलकरवर बरसला 'हा' मुंबईकर खेळाडू, 57 चेंडूतच ठोकले शतक

वाचा-World Cup : एकेकाळी संघाचा होता कोच, निवृत्तीनंतर झाला इंग्लंडचा फिल्डर

SPECIAL REPORT : 'राज'आदेश कुणी नाही पाळला, मनसेची मतं गेली कुठे?

First Published: May 26, 2019 04:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading