दुबई, 14 मे : सध्या सर्व जगाचं लक्ष लागले आहे ते विश्वचषकाकडे. 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्व संघ कसुन तयारी करत असताना, आता आयसीसीसुध्दा विश्वचषकासाठी सज्ज झाली आहे. कारण विश्वचषकावर सध्या मॅच फिक्सिंगचं सावट आहे. या विरोधात आता आयसीसीनं तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी आता विश्वचषकात सामील होणाऱ्या प्रत्येक संघासोबत एक लाचलुचपत प्रतिबंधक ऑफिसर असणार आहे. जो ऑफिसर सर्व संघावर लक्ष तर ठेवणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार लाचलुचपत विभागाचे अधिकारी सराव सामन्यांपासून ते या स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत सर्व संघासोबत असतील. याआधी लाचलुचपत विभागाचे अधिकारी संघासोबत नाही तर, खेळपट्टीवर हजर असायचे. यात त्यांचा हेतू हा, खेळाडूंवर, संघाच्या इतर अधिकाऱ्यांवर, प्रशिक्षकांवर लक्ष ठेवणे हा असतो. मात्र यंदाच्या विश्वचषकात एक अधिकारी एका संघासोबत अंतिम सामना होईपर्यंत असणार आहे. त्यामुळं मॅच फिक्सिंग सारख्या गोष्टींवर आळा बसू शकतो. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, जर अधिकारी हॉटेलमध्ये खेळाडू आणि इतर अधिकाऱ्यांसोबत असतील तर, खेळाडूंवर देखरेख ठेवता येईल. त्यामुळं फिक्सिंग सारख्या प्रकारापासून विश्वचषकाला लाबं ठेवता येईल. वाचा- IPL 2019: गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्स येथे आयसीसी विश्वचषकाला सुरुवात होत आहे. त्यामुळं सर्व संघ जोमाने सराव करत आहेत. यात टॉप दहा संघ मैदानावर उतरतील, यातील महिला सामना इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात 30 मे रोजी होणआर आहे. तर, भारतीय संघाचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेसोबत होणार आहे. दरम्यान विजेतेपदाच्या दावेदारांमध्ये विराटसेना सध्या अव्वल क्रमांकावर आहे. असा आहे भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा. वाचा- आयपीएलमध्ये भारताला सापडला ‘कॅप्टन कूल’, यानं केले विराटच्या कॅप्टन्सीला चॅलेंज वाचा- तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची ‘ही’ हॉट फॅन कुख्यात गुंडाचा ‘वाढीव’पणा, शस्त्रासह टिक टॉकवर बनवला VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







