जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / आयपीएलमध्ये भारताला सापडला 'कॅप्टन कूल', यानं केले विराटच्या कॅप्टन्सीला चॅलेंज

आयपीएलमध्ये भारताला सापडला 'कॅप्टन कूल', यानं केले विराटच्या कॅप्टन्सीला चॅलेंज

LONDON, ENGLAND - JUNE 17: Virat Kohli, Captain of India looks on during the Previews - ICC Champions Trophy Final at The Kia Oval on June 17, 2017 in London, England. (Photo by Harry Trump-IDI/IDI via Getty Images)

LONDON, ENGLAND - JUNE 17: Virat Kohli, Captain of India looks on during the Previews - ICC Champions Trophy Final at The Kia Oval on June 17, 2017 in London, England. (Photo by Harry Trump-IDI/IDI via Getty Images)

भारताला दोन वर्ल्ड कप मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला कॅप्टन कूल या नावानेच ओळखले जाते. आता भारतालाही आणखी एक कॅप्टन कूल मिळाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 14 मे : चेन्नईला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12 व्या हंगामाचं विजेतेपद पटकावलं. मुंबईचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टाकलेल्या शेवटच्या षटकात मुंबईने एका धावेनं विजय साजरा केला. मुंबईने दिलेलं 150 धावांचं आव्हान चेन्नई सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने सामन्यावर पकड मिळवली. धोनी बाद झाल्यानंतर चेन्नईचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली. याच षटकात शेन वॉटसन धावबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर शार्दुल ठाकुरला बाद करत मलिंगाने मुंबईला विजय मिळवून दिला. याबरोबरच मुंबईनं इतिहास घडवला आणि सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावलं. यात कर्णधार रोहित शर्माचा वाटा खुप महत्त्वाचा होता, कारण या चारही विजेतेपदात रोहित शर्मानं कर्णधारपदाची भूमिका निभावली होती. या विजयामुळं आता सोशल मीडियावर आता विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा चांगला कर्णधार आहे असा युक्तीवाद चाहत्यांमध्ये सुरु आहे. आता फक्त चाहतेही नाही तर भारताचा धडाकेबाज सलामीवीर विरेंद्र सहवाग यानंही रोहित शर्मा हा सर्वात चांगला आणि संयमी कर्णधार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याआधी महान फलंदाज आणि मुंबई संघाचा सल्लागार सचिन तेंडुलकर यानंही रोहित शर्माच्या नेतृत्तावचे कौतुक केले होते. रोहित, विराटपेक्षा चांगला फलंदाज आहे त्याची ही आहेत कारणं. संयमी कर्णधार भारताला दोन वर्ल्ड कप मिळवून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला कॅप्टन कुल या नावानेच ओळखले जाते. तसाच काहीसा रोहितही मैदानावर शांत आणि संयमी असतो. रोहित शर्माची जमेची बाजू म्हणजे तो, खेळाडूंच्या अनुभवाचा योग्य वापर करतो. आयपीएलच्या अंतिम सामन्यातही असेच काहीसे घडले. त्यानं अंतिम षटकार टाकण्यासाठी सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यांच्या हातात चेंडू दिला. आणि एका धावानं मुंबईनं चेन्नईवर मात केली. योग्य खेळाडूंची निवड रोहित शर्माच्या खासियत म्हणजे तो संघ निवड योग्य करतो. रोहित शर्मा खेळपट्टी आणि विरोधी संघाच्या हिशोबानं आपला संघ निवडतो. म्हणून त्यानं अंतिम सामन्यात अनुभवी गोलंदाज मिशेल मॅकल्घन याला जयंत यादवच्या बदल्यात संधी दिली. वाचा- IPL 2019: गुडघ्यातून रक्तस्राव सुरू असतानाही तो धोनीसाठी मैदानात लढत होता मैदानाची योग्य समज रोहित शर्मा कर्णधार म्हणून मैदानाची त्याला योग्य जाणं आहे. पिच कसा असेल आणि त्यावर कोणते खेळाडू चालतील याची योग्य समज त्याला असल्यामुळं नाणेफेक जिंकत तो योग्य निर्णय घेतो. अंतिम सामन्यात गोलंदाजी धोनीचा कल गोलंदाजीकडे होता. मात्र रोहिनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि तो निर्णय योग्यही ठरला. कर्णधार म्हणून जबरदस्त रेकॉर्ड रोहित शर्माचे कर्णधार म्हणून आकडे जबरदस्त आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चार वेळा मुंबई इंडियन्सनं विजेतेपद पटकावले आहेत. असं करणारा रोहित शर्मा एकमेव कर्णधार आहे. वाचा- World Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनोखी लढत, ‘हे’ आकडे वाचून व्हाल थक्क VIDEO: सिंधुदुर्गातील दोन गावांमध्ये 6 हत्तींचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीती

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात