World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!

World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!

ICC Cricket World Cup 2019 : शिखर धवनला दुखापत झाल्याने रिषभ पंत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंडला पोहचेल.

  • Share this:

लंडन, 14 जून : इंग्लंडमध्ये ICC Cricket World Cup  स्पर्धा 30 मे पासून सुरू झाल्या आहेत. या स्पर्धेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून जबरदस्त सुरूवात केली. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली. अद्याप तो नक्की किती सामने खेळू शकणार नाही हे समजले नसले तरी किमान दोन आठवडे त्याला खेळता येणार नाही. आता त्याच्या जागी राखीव खेळाडू म्हणून रिषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आलं आहे.

भारताच्या वर्ल्ड कप संघात रिषभ पंतला स्थान मिळू शकलं नव्हतं. संघात निवड समितीने दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला घेतलं होतं. त्याचा अनुभव महत्त्वाच्या सामन्यात धोनी मुकला तर कामी येऊ शकतो असं निवड समितीने म्हटलं होतं. आता शिखर धवन तंदुरुस्त झाला नाही तर त्याला कव्हर म्हणून पंत संघात असेल.

रिषभ पंत जरी इंग्लंडला पोहोचला तरी त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही. खलील अहमद प्रमाणेच तोसुद्धा दुसऱ्या वाहनाने प्रवास करेल. याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी रिषभ पंत इंग्लंडला पोहोचेल. अद्याप शिखर धवन संघात असल्याने पंत संघात नाही. त्यामुळे त्याला खलील अहमदसोबत प्रवास करावा लागेल.

वाचा : World Cup : पाऊस पडणाऱ्या इंग्लंडमध्येच का घेतली स्पर्धा?

सामन्याच्या दिवशी पंतला ड्रेसिंग रुममध्ये जाता येणार नाही. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आयसीसीच्या नियमानुसार रिषभ पंतला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाता येणार नाही. गेल्या वर्ल्ड कपमध्ये भुवनेश्वर कुमारला कव्हर म्हणून धवल कुलकर्णीला ऑस्ट्रेलियात पाठवण्यात आलं होतं. पण त्यालाही ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश नव्हता.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

First published: June 14, 2019, 6:52 AM IST

ताज्या बातम्या