Elec-widget

World Cup : ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

World Cup : ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे 3 आठवडे खेळू शकणार नाही.

  • Share this:

लंडन, 12 जून : ICC World Cupमध्ये सध्या सर्व संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर येण्यासाठी धडपडत आहेत. तर, वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आपली विजयी घौडदौड कायम राखण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला धुळ चारल्यानंतर आता विराट सेना न्यूझीलंडला हरवण्यासाठी सज्ज आहे. मात्र या सामन्याआधी विराटला मोठा झटका बसला आहे, भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन जखमी झाल्यामुळं त्यानं वर्ल्ड कपमधून तीन आठवड्यांसाठी माघारी घेतली आहे. त्यामुळं आता शिखरची जागा कोण घेणार यावरुन चर्चा सुरु झाली होती.

भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे 3 आठवडे खेळू शकणार नाही. त्यामुळे लीग सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. जर तो वेळेच्या आधी तंदुरुस्त झाला तर शेवटच्या साखळी सामन्यात मैदानात उतरू शकतो. धवन बाहेर झाल्याने त्याच्या जागी कोण खेळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळेल याची चर्चा सुरू आहे. शिखरला पर्याय म्हणून केएल राहुल सलामीला येऊ शकतो, मात्र अकरा खेळाडूंच्या यादीत सामिल होण्यासाठी ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार धवनला संघाच्या बाहेर करण्यात आलेले नाही. धवनवर इंग्लंडमध्येच उपचार करण्यात येणार आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. मात्र यासंदर्भात बीसीसीआयनं यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. आयपीएल 2019मध्य ऋषभ पंतची कामगिरी चांगली राहिली होती. मात्र त्याला वर्ल्ड कपच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्याबदली दिनेश कार्तिला संघास धीदिली होती.

Loading...

ऑस्ट्रेलियाविरोधात धवन झाला होता जखमी

ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात फलंदाजी करत असताना शिखर धवनच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. जलद गोलंदाज कुल्टर नाईलचा चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता.त्यामुळं त्याला दुसऱ्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करता आले नाही. याच सामन्यात धवननं 117 धावांची खेळी केली होती. त्यामुळं धवनची कमी विराटला जाणवणार आहे.


SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com