लंडन, 13 जून : इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या महासंग्रामाला 30 मे पासून सुरुवात झाली. पहिल्या आठवड्यात सर्व सामन्यांचा आनंद चाहत्यांनी लुटला. पण नंतर पावसाने काही सामने रद्द करण्याची वेळ आली तेव्हा मात्र चाहत्यांची निराशा झाली. त्यानंतर अनेकांनी पाऊस पडतोय तर आयसीसीला कळत नाही का? इंग्लंडमध्ये का घेतले सामने? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस असावा असंही मत काहींनी मांडलं होतं.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी स्पष्ट केलं की, ''प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवले तर स्पर्धा लांबली असती. आणि त्याचा फटका खेळपट्टीची तयारी, संघाला दुखापतीतून सावरण्याचा मिळणारा वेळ, राहण्याची सुविधा, पर्यटकांचा प्रवासाचा खर्च, या सर्वांना बसला असता. तसेच राखीव दिवशीही पाऊस पडणार नाही याची काय गॅरेंटी?'', असे स्पष्टीकरण दिले आहे.
आयसीसीचा हा 12 वा क्रिकेट वर्ल्ड कप आहे. पहिल्या वर्ल्ड कपपासून आता पर्यंत इंग्लंडने सर्वाधिक 5 वेळा यजमानपद भूषवलं आहे. पहिले 3 वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच झाले. त्यानंतर 1987 ला पहिला वर्ल्ड कप इंग्लंडबाहेर झाला तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये. त्यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात 1992 चा वर्ल्ड कप खेळवण्यात आला. पुन्हा भारतीय उपखंडात 1996 चा वर्ल्ड कप झाला.
1999 ला इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत काही सामने स्कॉटलंड, आयर्लंड,नेदरलँड आणि वेल्स मध्ये झाले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत 2003 चा वर्ल्ड कप झाला. तर पुढचा 2007 चा वर्ल्ड कप वेस्ट इंडिजमध्ये खेळण्यात आला. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये सामने खेळण्यात आले. 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाला यजमानपद मिळालं. 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे.
Dear @ICC
— Nishaanth Ramakrishnan (@nyshawnn) June 13, 2019
When you know this is the season of Rain in England why hold it there? What happens to the spectators who pay the money?
Very sad #DearICC #ICCCricketWorldCup #INDvsNZ
वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या देशात करायचे यासाठी आयसीसीचे सदस्य देश बोली लावतात. यामध्ये जो देश जिंकेलं त्यांना संधी मिळते. त्याशिवाय रोटेशन पद्धतीने 20 वर्षांत प्रत्येक देशाला आयोजनाची संधी दिली जाते. रोटेशन पद्धतीबाबत आयसीसीचा कोणताही अधिक़त नियम नाही. मात्र आधीचे वर्ल्ड कप कधी, आणि कुठे झाले यावरून इतर देशांचा विचार केला जातो.
2011 मध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेत वर्ल्ड कप सामने झाले होते. त्यानंतर 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला संधी दिली गेली. 2011 मध्ये बोलीमध्ये त्यांना अपयश आले होते. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडची निवड झाली कारण याआधी त्यांनी 1999 मध्ये यजमानपद भूषवलं होतं. त्यामुळे रोटेशनल पॉलिसीचा विचार करता इंग्लंडकडे यजमानपद गेले.
Dear icc declare rain as the #CWC19 champions this time , so much money will be saved,no more games. And invest the same in hiring some experts who can plan the schedule better. #INDvNZ
— the_one 🇮🇳 (@m_djdurgesh) June 13, 2019
वर्ल्ड कपसारखी एवढी मोठी स्पर्धा असताना त्याच्या नियोजनात वातावरणाची बाब कशी दुर्लक्षित राहिली असाही प्रश्न विचारला जात आहे. पण खरंतर इंग्लंडमध्ये जून महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणापेक्षा यंदा जरा जास्तच पाऊस पडला आहे. त्याचाच फटका वर्ल्ड कपमधील सामन्यांना बसला.
वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा
वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?
वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का
SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?