World Cup : गोलंदाजांच्या कामगिरीने विराटची डोकेदुखी वाढली!

ICC Cricket World Cup : भारताने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चार सामन्यात विजय मिळवले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 10:58 AM IST

World Cup : गोलंदाजांच्या कामगिरीने विराटची डोकेदुखी वाढली!

लंडन, 24 जून : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने विजयी घोडदौड कायम राखली आहे. भारताची कामगिरी अशीच राहिली तर सेमिफायनलला सहज प्रवेश करेल. मात्र, अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाने भारताला विजयासाठी झुंजवले. अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मधल्या फळीत विशेषत: भारताच्या चौथ्या क्रमांकावर अजुनही सक्षम पर्याय सापडलेला नाही. तर गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची असा प्रश्न विराटसमोर असेल.

भारताच्या गोलंदाजांनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. यामुळे प्लेइंग इलेव्हन ठरवताना विराटची डोकेदुखी वाढली आहे. सध्या बुमराह, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार हे चौघे संघात आहेत. शिखर धवनच्या जागी विजय शंकरला संघात घेतल्यानंतर तो पाचवा गोलंदाज आहे. तर हार्दिक पांड्यानेसुद्धा गोलंदाजी केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध भुवनेश्वरला दुखापतीने उतरता आले नाही. त्याच्याजागी खेळणाऱ्या मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमधील पदार्पणाच्या सामन्यात हॅट्ट्रिक घेतली. त्यामुळे पुढच्या सामन्यात भुवनेश्वर फिट झाल्यास त्याला संघात घेताना शमीला बाहेर बसवावे लागेल.

World Cup : पाकिस्तान पोहचणार सेमीफायनलला? टॉप 4 मधील एक संघ पडू शकतो बाहेर!

अफगाणिस्तानविरुद्धची शमीची कामगिरी पाहता त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवायचं का असा प्रश्न विराटसमोर असेल. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाने रद्द झाला. भारताचे उर्वरित सामने वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध आहेत.

चौथ्या क्रमांकावर कोण?

Loading...

वर्ल्ड कपमध्ये 4 सामन्यात भारताने चार नंबरवर तीन फलंदाज खेळवले. यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. पांड्या नेहमी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो पण सामन्यातील परिस्थिती पाहून त्याला बढती दिली गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलला संधी देण्यात आली होती. चौथ्या क्रमांकासाठी तोच योग्य पर्याय होता. मात्र, शिखर धवन स्पर्धेला मुकल्यानं त्याला सलामीला उतरावं लागत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध विजय शंकर चौथ्या क्रमांकावर उतरला.

आम्ही बुडालोच आहे, तुम्हालाही बुडवणार; अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा इशारा!

विजय शंकर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करणाऱ्या विजय शंकराला वर्ल्ड कपमध्ये फक्त एकदा चौथ्या क्रमांकावर फंलदाजी करण्याची संधी मिळाली आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध फक्त 29 धावा केल्या. शंकर गोलंदाजीसुद्धा करू शकतो. त्याने पाकिस्तानविरुद्ध दोन विकेट घेतल्या.पण त्याला अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजी दिली नाही.

दिनेश कार्तिक

भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी दावेदारांची कमी नाही. राखीव यष्टीरक्षक म्हणून संघात असलेल्या दिनेश कार्तिकने आतापर्यंत 77 डावात फलंदाजी केली असून यात सर्वाधिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकलं नाही. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 38.72 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. कार्तिकच्या अनुभवाचा फायदा भारताला होऊ शकतो.

रिषभ पंत

शिखर धवन बाहेर पडल्यानं संघात रिषभ पंतला संधी मिळाली आहे. मात्र अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळू शकलेलं नाही. पंतने फक्त 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने गेल्या वर्षी इंग्लडंमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत शतक केलं होतं. त्यानंतर आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहेत. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर पंतसुद्धा दावेदार ठरू शकतो.

World Cup : इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा, स्पर्धेतून बाहेर होणार?

World Cup Point Table : पाकचा आफ्रिकेवर विजय, पाहा कोण कितव्या स्थानावर?

VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 10:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...