लंडन, 24 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत अफगाणिस्तानने भारताविरुद्ध अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी भारताविरुद्धच्या कामिगिरीने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सोमवारी त्यांची लढत बांगलादेशसोबत होणार आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबनं सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्याच अंदाजात बांगलादेशला इशारा दिला आहे. आमचे आव्हान संपुष्टात आलं आहे आता तुमचेही आव्हान संपेल असं सांगत त्यांने सामना आम्ही जिंकू असा विश्वास असल्याचं म्हटलं आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीनने बांगलादेशला इशारा देण्यासाठी हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डुबेंगे या ओळींचा वापर केला. अफगाणिस्तानचे पुढचे सामने बांगलादेश, पाकिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याविरुद्ध आहेत. बांगलादेशने सहापैकी दोन सामने जिंकले तर तीन मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. बांगलादेश गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर आहे. बांगालदेशचे उर्वरित सामने अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध आहेत. यात एक जरी पराभव झाला तरी त्यांना सेमिफायनल गाठता येणार नाही. उरलेले तीनही सामने जिंकल्यास त्यांना संधी मिळू शकते. मात्र, धावगती कमी असल्याने त्यांना ‘जर.. तर’च्या खेळावर अवलंबून रहावं लागेल. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्ध असलेला सामना त्यांचासाठी महत्त्वाचा असणार आहे. World Cup : इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा, स्पर्धेतून बाहेर होणार? World Cup Point Table : पाकचा आफ्रिकेवर विजय, पाहा कोण कितव्या स्थानावर? VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







