लंडन, 22 जून : वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार समजला जाणाऱ्या इंग्लंडला लंकेनं 20 धावांनी पराभूत केलं. श्रीलंकेनं दिलेल्या 232 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 212 धावा करू शकला. यंदाच्या वर्ल्ड कपमधील हा त्यांचा फक्त दुसरा पराभव आहे. याआधी त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर लंकेनं दिलेल्या दणक्यानंतर वर्ल्ड कपमधील पुढची वाटचाल करणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. सध्या श्रीलंका पाचव्या स्थानावर असून सहाव्या स्थानी बांगलादेश आहे. इंग्लंडने अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिजवर विजय मिळवले आहेत.या चारही सामन्यात त्यांनी नाणेफेक जिंकली होती. तर ज्या दोन सामन्यात पराभव झाला होता त्यात नाणेफेक हारले होते. इंग्लडचे आता तीन सामने राहिले आहेत. त्यात त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्याशी होणार आहे. यामुळे त्यांच्यावर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचं मोठं आव्हान असणार आहे. इंग्लंडची तीन सामन्यात अशा संघांसोबत गाठ पडणार आहे जे सध्या टॉप 4 मध्ये आहेत. इंग्लंडचा वर्ल्ड कपमधील 27 वर्षातील इतिहास बघितला तर त्यांना यावेळी सेमीफायनल गाठणं कठीण आहे. 1992 पासून त्यांना ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. या तीन संघाविरुद्ध त्यांना 10 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. वाचा- विराटसाठी आनंदाची बातमी, वर्ल्ड कप गाजवणारा अष्टपैलू खेळाडू फिट वाचा- वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या विराटसेनेचं रुप पालटलं, PHOTO व्हायरल वाचा- …म्हणून पाक संघानं ऐकला नाही PM इमरान यांचा सल्ला सानियासाठी ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ उतरली मैदानात, ट्रोल करणाऱ्यांना खडसावलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







