World Cup : इथं 20 वर्षांनी India vs Pakistan लढत, वाचा कशी असेल खेळपट्टी आणि हवामान

World Cup : इथं 20 वर्षांनी India vs Pakistan लढत, वाचा कशी असेल खेळपट्टी आणि हवामान

ICC Cricket World Cup 2019 : India vs pakistan : रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 4 सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.

  • Share this:

मँचेस्टर,16 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी सातव्यांदा वर्ल्ड कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यापूर्वी सर्वांना एकच चिंता आहे. ती म्हणजे गेल्या आठवड्यात झालेले काही सामने पावसाने वाया गेले. आता या सामन्यात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मँचेस्टरमधील वातावरण चांगले राहिल. पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरी तो दिवसा पडण्याची शक्यता कमी आहे. तसेच ढगाळ वातावरण राहील असंही हवामान विभागानं सांगितलं आहे.

(वाचा: India Vs Pakistan : काळाबाजार तेजीत, एका तिकीटाची 'इतकी' किंमत!)

मँचेस्टरमध्ये वाऱ्यामुळं वेगवान गोलंदाजांना सामन्यात फायदा होऊ शकतो. संयमी खेळ करणाऱ्या फलंदाजांना धावा करता येतील. या मैदानावर सर्वाधिक धावा 318 झाल्या आहेत. 1999 मध्ये याच मैदानावर भारत-पाक लढत झाली होती. तेव्हा भारताने नाणेफेक जिंकली होती. भारताने या मैदानावर शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध 2007 मध्ये खेळला होता. त्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता.

(वाचा : World Cup : भारताविरुद्ध पाकिस्तानचा खेळाडू वापरणार 'विराट'अस्त्र)

आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये 4 सामने रद्द झाले आहेत. यात भारत-न्यूझीलंड यांच्या सामन्याचाही समावेश आहे. असे असले तरीही भारत - पाक सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे. सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना एक गुण दिला जाईल. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात.

(वाचा : World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!)

SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'अ‍ॅडवॉर'

First published: June 15, 2019, 7:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading