World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!

World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार!

ICC Cricket World Cup 2019 कोल्ह्याला द्राक्षे आंबट नाहीत असं म्हणत अपुऱ्या सुविधा देत आयसीसीने काही संघांसोबत दुजाभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

लंडन, 15जून : ICC Cricket World Cup 2019 मध्ये पहिल्या आठवड्यातील सामने सुरळीत पार पडले. त्यानंतर पावसामुळे एकाच आठवड्यात तब्बल चार सामने रद्द करावे लागले. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये मिळणाऱ्या सुविधांबाबत संघाने नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेच्या संघाने तक्रारही दाखल केली आहे. लंकेला आतापर्यंत दोनवेळा पावसाने दणका दिला. दोन सामन्यात त्यांना विजयाची संधी असताना एका गुणावर समाधान मानावे लागले. श्रीलंकेचे व्यवस्थापक अशांता डी मेल यांनी आरोप केला आहे की ज्या खेळपट्ट्यांवर सामने होत आहेत त्यावर कमी सुविधा दिल्या जात आहेत.

इंग्लंडमध्ये एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अशांता डी मेल म्हणाले की, आम्ही आतापर्यंत कार्डिफ आणि ब्रिस्टलवर चार सामने खेळले. ते सर्व सामने हिरवळ असलेल्या खेळपट्टीवर होते. दरम्यान इतर संघ मात्र पाटा खेळपट्टीवर खेळत होते. ज्या ठिकाणी जास्त धावा केल्या जातील अशी खेळपट्टी इतर संघांसाठी होती.

(वाचा- सामना रद्द झाल्याचा गुणतालिकेत विराटसेनेला फटका, न्यूझीलंडचा फायदा)

श्रीलंकेचे दोन सामने पावसाने रद्द झाले. तर एका सामन्यात त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला तर एका सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. ज्यावर विजय मिळवला त्या खेळपट्टीवर हिरवळ होती. पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध असेल तिथंसुद्धा अशीच खेळपट्टी असेल. याआधी या मैदानावर झालेल्या सामन्यात धावांची बरसात झाली होती. डी मेल यांनी म्हटलं आहे की, हिरवळ असलेली खेळपट्टी ऑस्ट्रेलियाला फायद्याची ठरेल.

(वाचा-World Cup : इंग्लंडमध्ये पंतला टीम इंडियाच्या ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी!)

अशांता डी मेल म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर हिरवळ आहे. हे म्हणजे कोल्ह्याला द्राक्षे आंबट झालीत असे नाही. पण आयसीसी हे चुकीचं करत आहे. त्यांनी काही संघांसाठी एकसारखी खेळपट्टी केली आहे तर इतर संघांसाठी वेगवेगळी. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत, असंही डी मेल म्हणाले. याबाबत आयसीसीकडे तक्रार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

(वाचा-ICC च्या नियोजनाचा फटका, World Cup चं स्वप्न राहणार अधुरं!)

कार्डिफमध्ये सरावासाठी दिलेल्या सोयीसुविधांबद्दल डी मेल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, तीनऐवजी फक्त दोनच नेट सरावासाठी देण्यात आले होते. तर ब्रिस्टलमध्ये आम्ही जिथं थांबलो तिथं स्विमिंग पूल नाही जो प्रत्येक संघासाठी खूप महत्त्वाचा असतो. चार दिवस आधी आम्ही याबाबत सांगितलं होतं पण त्यावर कोणतंही उत्तर आलं नसल्याचं डी मेल म्हणाले.

SPECIAL REPORT : विधानसभेसाठी राज ठाकरेंचा काय असणार आहे मेगा प्लॅन?

First published: June 15, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading