लंडन, 15 जून : ICC Cricket World Cup 2019 : India vs Pakistan यांच्यात रविवारी होणाऱ्या सामन्याचा ज्वर दोन्ही देशांत बघायला मिळत आहे. दोन्ही देशांनी जाहिरातीमधून आम्हीच सामना जिंकणार असं सागंण्याचा प्रयत्न करताना एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, खेळाडू मात्र सरावामध्ये घाम गाळत आहेत. न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाला तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारण्यात आला की, 16 जूनला होणाऱ्या सामन्याबद्दल काय मत आहे? तेव्हा सचिनने काय आहे 16 जूनला असे म्हणत पाकिस्तानला अवाजवी महत्त्व देण्याची गरज नसल्याचंच अप्रत्यक्ष सांगितलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीनेसुद्धा यापूर्वी आम्ही वर्ल्ड कपवर जास्त लक्ष दिलं असून पाकिस्तानला इतर संघांपेक्षा जास्त महत्त्व देत नाही असं म्हटलं होतं. पाकिस्तानचे खेळाडूसुद्धा कसून सराव करत आहेत. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने भारताविरुद्धच्या सामन्यात कोणतीही चूक चालणार नाही असं खेळाडूंना बजावलं आहे. आता पाकच्या फलंदाजाने चक्क भारताविरुद्ध विराटच्याच फलंदाजीचा वापर करण्याचं ठरवलं आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम विराट कोहलीचे व्हिडिओ पाहून रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी तयारी करत आहे. त्याने म्हटलं आहे की, मी कोहलीची फलंदाजी पाहतो. वेगवेगळ्या परिस्थितीत तो कशाप्रकारे खेळतो ते पाहून फलंदाजी करण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करतो. भारताच्या विजयात त्याच्या योगदानाचे प्रमाण जास्त आहे असंही बाबर आझमने सांगितलं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने 63 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला होतदा. तसेच बाबर म्हणाला की, दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळवलेल्या विजयातून आम्ही प्रेरणा घेत आहोत. यातून आमचा आत्मविश्वास वाढतो. भारताकडे जगातील अव्वल गोलंदाज आहेत त्याला कसे उत्तर देणार यावर बाबर म्हणाला की, आम्ही इंग्लंडच्या माऱ्यासमोर टीकाव धरला. त्याच अनुभवाच्या जोरावर भारतीय गोलंदाजी खेळू असा विश्वास आहे. यावेळी आम्ही सकारात्मक आहे असंही त्याने सांगितलं. पाकिस्तानी बशीर चाचाला मिळालं नाही तिकीट, धोनीच्या भरोशावर पोहोचला सामना बघायला! वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात. World Cup : ICCने संघाला दिलं झुकतं माप, खेळपट्टी-सोयी सुविधांबाबत केली तक्रार! SPECIAL REPORT: भारत-पाकिस्तान सामन्याआधी ‘अॅडवॉर’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







