लंडन, 14 जून : ICC Cricket World Cup मध्ये फायनलपेक्षा जास्त लक्ष लागून राहिलं आहे ते 16 जूनला होणाऱ्या सामन्याकडे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान सामन्याची तिकिटं काही तासांत संपली. ज्या मैदानावर सामना होणार आहे त्याची आसनक्षमता 20 हजार इतकी आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तिकीट खिडकीवर काही तासात सर्व तिकीटे संपली होती. ज्यांनी त्यावेळी खरेदी केली होती ते लोक आता जास्त दराने तिकीट विकत आहेत. इंग्लंडमध्ये अनेक वेबसाईट भारत-पाक सामन्याचे तिकीट विकत आहेत. सुमारे 500 च्या आसपास तिकीटे वेबसाईटवर विक्रीला उपलब्ध आहेत. यामध्ये ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम तिकीटे आहेत. ब्रॉन्झ आणि सिल्वर कॅटेगरीतील तिकीटे विकली आहेत. यासाठी लोकांनी 17 ते 27 हजार रुपये मोजले आहेत. आता या वेबसाइटकडे 58 गोल्ड आणि 51 प्लॅटिनम तिकीटे उपलब्ध आहेत. या तिकीटांच्या किमती 47 ते 62 हजार रुपयांपर्यंत आहे. तिकीटे विकत घेणाऱ्यांना मेलद्वारे माहिती दिली जाईल की त्यांना तिकीट कधी आणि कसे मिळणार? आयोजकांनी विक्री केलेल्या किंमतीच्या कितीतरी पटीने अधिक किंमत चाहते मोजत आहेत. याची कल्पना तिकीटे विकणाऱ्या वेबसाइटने दिली आहे. आयोजकांनी विक्री केलेल्या किंमतीचा वेबसाइटवरील किंमतीशी काहीही संबंध नाही असेही त्या वेबसाइटने म्हटलं आहे. ICC तुम्हाला जमणार नाही असे भरवा सामने, भडकलेल्या चाहत्यांनी सुचवले भन्नाट उपाय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका झालेली नाही. फक्त आयसीसीच्या स्पर्धेत दोन्ही संघ आमने सामने येतात. भारत पाकिस्तानशिवाय अफगाणिस्तान, इंग्लंड यांच्याविरुद्ध सामन्याची तिकीटांनासुद्धा मागणी आहे. बुमराहला या अभिनेत्रीने केलंय क्लीन बोल्ड? पाहा कोण आहे ती! उदयनराजेंचं तुळजाभवानीला साकडं, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







