World Cup : पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

World Cup : पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

क्रिकेटच्या मैदानाबाहेर जास्त चर्चेत असणारा हार्दिक पांड्या आता त्याच्या एक भन्नाट सवयीमुळं चर्चेत आहे.

  • Share this:

लंडनं, 19 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. विराटसेनेनं एकही सामना गमावलेला नाही. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांना नमवत भारत गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. यात टीम इंडियाचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्याची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. पाकिस्तान विरोधात हार्दिक पांड्यान घेतलेल्या दोन विकेट सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

मात्र, नुकतेच बीसीसीआयनं अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्यानं एक खळबळजनक खुलासा केला आहे. पांड्याची जेवढी चर्चा मैदानात होते, तेवढाच तो मैदानाबाहेरही चर्चेत असतो. कॉफी विथ करण कार्यक्रमात मुलींवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन त्यावर टीका झाली होती. त्यामुळं क्रिकेटपेक्षा जास्त त्याची ओळख ही त्याच्या लाविश लाईफमुळं आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनं आपल्या चहल टिव्हीच्या माध्यमातून पांड्याची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पांड्या म्हणजे चालतं फिरतं डायमंडचं दुकान असल्याचं चहलनं सांगितले. चहलनं घेतलेल्य मुलाखतीत पांड्यानं डायमंडवर आपला जीव असल्याचे जाहीर केले होते.

एवढेच नाही तर पांड्यांकडे डायमंडची बॅट आणि बॉलही आहे. वर्ल्ड कपसाठी पांड्यानं स्पेशल पेंडन बनवले आहे, ज्यात डायमेंडचा बॅट आणि बॉल आहे. तर, या पेंडनमध्ये चेंडू काळ्या रंगाचा आहे. यावर चहलनं, "तुला नजर लागू नये म्हणून असं केलं आहेस का", असा सवाल विचारला. एवढचं नाही तर, त्याच्याकडे डायमंडची चेन, अंगठी आणि घड्याळही आहे.Loading...

सध्या वर्ल्ड कपच्या संघात असलेल्या पांड्यानं बॅट आणि बॉलसह चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात त्यानं जलद धावा केल्या तर, पाकिस्तान विरोधात मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेतल्या.


याआधी हार्दिक पांड्यानं, “भारतीय संघासाठी खेळणं माझा श्वास अहे, आणि हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे असेही सांगितले. तसेच यावेळी त्यानं पुढच्या काही आठवड्यांसाठीचा आपला प्लॅनही सांगितला. हा प्लॅन म्हणजे वर्ल्ड कप जिंकणे”. या मुलाखतीत त्यानं, “मी असा खेळाडू आहे जो खेळावर प्रचंड प्रमे करतो. मी प्रत्येक सामने चिकाटीनं खेळतो. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वर्ल्ड कपसाठी तयारी करत असून आता ती वेळ आली आहे”, असे म्हटले होते.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा- World Cup : गर्लफ्रेंडच्या ट्रॅपमध्ये अडकला होता हा खेळाडू, केली विक्रमी खेळी!

वाचा- बुमराहने शेअर केला 'हा' फोटो, चाहत्यांनी विचारलं अनुपमा आहे का?

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...