सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

क्रिकेटच्या मैदानात आपल्या वेगाने फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या शोएब अख्तरनं सोनाली बाबतीत एक धक्कादायक खुलासा केला होता.

  • Share this:

लंडन, 19 जून : क्रिकेटच्या मैदानात आपल्या वेगाने फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या शोएब अख्तरने एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला होता. शोएब भारत दौऱ्यावर असताना त्याची ओळख अभिनेत्री सोनाली बेंद्रेशी झाली आणि त्याचक्षणी तो तिच्या प्रेमात पडला. एवढंच नाही तर सोनालीचा इंग्लिश बाबू देसी मेम हा सिनेमा पाहिल्यानंतर तो सोनालीचा फार मोठा चाहता झाला. तो सोनालीचा फोटो आपल्या पाकिटात घेऊन फिरायचा. तसंच त्याच्या खोलीत सोनालीचे पोस्टरही असायचे. मात्र आता शोएबनं या सगळ्याचे खंडन केले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बॉलीवूडची मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअर भाष्य केले आहे. त्यानं आपल्या युट्यूब व्हिडिओ चॅनलवर, मी कधी सोनालीला भेटलोच नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. जवळजवळ 10-15 वर्षांपूर्वी शोएब आणि सोनाली बेंद्रे यांचे नाव जोडले गेले होते. त्यातच शोएबनं, "मला सोनाली एवढी आवडते, की मी तिला किडनॅप करेन", असेही सांगितले होते. मात्र आता त्यानं हे सगळे खोटे असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात सोनालीला विचारले असता तिने शोएब अख्तर नावाच्या कोणत्याही पाकिस्तानी क्रिकेटपटूला ओळखत नसल्याचं स्पष्ट केलं. सोनाली म्हणाली होती की, तिला क्रिकेटमध्ये फारसं स्वारस्य नसल्यामुळे तिला कोणत्याच खेळाडूचं नाव माहीत नसतं.

'ती सुंदर पण मी तिचा फॅन नाही'

शोएबनं आपल्या व्हिडिओमध्ये, "मी आजपर्यंत सोनालीला कधी भेटलो नाही. ती सुंदर आहे, पण मी तिचा फॅन नाही. मी तिचे दोन सिनेमे पाहिले आहेत. पण त्या प्रेरणीदायी आहेत", असं म्हणाला.

'कधीच नव्हता सोनालीचा पोस्टर'

सोनालीचा फोटो आपल्या पाकिटात घेऊन फिरायचा. तसंच त्याच्या खोलीत सोनालीचे पोस्टरही असायचे, अश्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर माझ्या घरात फक्त इमरान खानचे पोस्टर होते असे सांगितले.

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

First published: June 19, 2019, 8:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading