World Cup : गर्लफ्रेंडच्या ट्रॅपमध्ये अडकला होता हा खेळाडू, केली विक्रमी खेळी!

World Cup : गर्लफ्रेंडच्या ट्रॅपमध्ये अडकला होता हा खेळाडू, केली विक्रमी खेळी!

ICC Cricket World Cup 2019 : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनचं क्रिकेट करिअर त्याच्या गर्लफ्रेंडमुळे धोक्यात आलं होतं.

  • Share this:

मँचेस्टर, 19 जून : इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी खेळी केली. त्याने 71 चेंडूत 148 धावा केल्या. मॉर्गन जितका मैदानावरील खेळानं चर्चेत आहे. तितकाच तो मैदानाबाहेरसुद्धा चर्चेत असतो. वर्ल्ड कपमध्ये त्याने चार सामन्यात 249 धावा केल्या आहेत. यात त्याने 62.25 च्या सरासरीने आणि 136.81 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मॉर्गनने सर्वाधिका 22 षटकार मारले आहेत त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचचा नंबर लागतो. फिंचने 14 षटकार मारले आहेत.

इयॉन मॉर्गन हा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणारा असा क्रिकेटपटू आहे जो दोन देशांकडून वर्ल्ड कप खेळला आहे. मॉर्गनचा जन्म आयर्लंडमध्ये झाला. त्याने आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इतकंच नाही तर दोन देशांकडून खेळताना त्याने शतकही केलं आहे. आयर्लंडकडून खेळताना 2007 मध्ये कॅनडाविरुद्ध त्याने 115 धावांची खेळी केली होती. तर 2010 मध्ये इंग्लंडकडून खेळताना बांगलादेशविरुद्ध शतक करून त्याने आपल्या नावावर अनोख्या कामगिरीची नोंद केली होती.

(वाचा- सानियानं काढला 'ती'च्यावर राग म्हणाली, 'मी पाकिस्तान संघाची आई नाही')

आयर्लंडच्या अंडर 19 संघाचा कर्णधार म्हणून मॉर्गन काही काळ क्रिकेट खेळला. आयर्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक करण्यापासून फक्त एका धावेनं चुकला होता. फेब्रुवारी 2007 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा मॉर्गन आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला होता. याशिवाय आयपीएलमध्ये खेळणारा पहिला इंग्लिश खेळाडू होता. 2008 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात खेळला होता. इंग्लंडकडून खेळताना मॉर्गनने आयर्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. त्याने 2013 मध्ये आयर्लंड विरुद्ध 124 धावा काढल्या होत्या.

(वाचा- World Cup : ठरलं ! 'या' चार संघांना मिळणार सेमीफायनलचे तिकीट)

यंदा नव्या वर्षाीची सुरुवात मॉर्गनच्या क्रिकेट कारकिर्दीवर परिणा करणारी ठरली असती. त्याची एक्स गर्लफ्रेंड ब्रूक साकिराकिसच्या बॉयफ्रेंडनं ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. एक्स गर्लफ्रेंडच्या बॉयफ्रेंडनं दावा केला होता की, त्याच्याकडे ब्रूक आणि मॉर्गन यांच्यात झालेल्या सेक्सचॅटचं रेकॉर्ड आहे. मात्र, एक्स गर्लफ्रेंडच्या बॉयफ्रेंडनं नंतर मॉर्गनची माफी मागितली होती. इयॉन मॉर्गनचं ऑस्ट्रेलियाशी एक वेगळं नातं आहे. ते म्हणजे त्याची पत्नी टारा रिगवे ऑस्ट्रेलियाची आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 एकदिवसीय सामन्यात 40.73 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकांचा समावेश आहे.

लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 06:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading