लंडन, 13 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेला 30 मेपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या 18 सामन्यापैकी 4 सामने पावसाने रद्द करावे लागले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रद्द झाला. यामुळे आयसीसीवर टीका केली जात आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात असताना हवामानाचा अंदाज नव्हता का? वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे सामने रद्द होण्याचा विक्रम झाला आहे. याआधी 1992 आणि 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येकी 2 सामने रद्द झाले होते.
वर्ल्ड कपची रंगत वाढत असतानाचा पावसाने त्याचा बेरंग केल्याचं चित्र आता दिसत आहे. अनेकांनी वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यानंतर एक दिवस राखीव हवा असं म्हटलं आहे. मात्र, आयसीसीने अर्थिकदृष्ट्या मोठ्या स्पर्धेत हे शक्य नसल्याचं स्पष्ट केल आहे.
सामने रद्द होण्याचा परिणाम संघांच्या गुणतक्त्यातील स्थानावर होत आहे. सध्या पाकिस्तान, श्रीलंका, भारत, न्यूझीलंड यांना एक एक गुण सामना रद्द झाल्याने मिळाला. ज्यावेळी हे संघ सेमीफायनलला स्थान मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करतील तेव्हा हे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. यात पावसामुळे गमावलेले गुण संघाला स्पर्धेतून बाहेर ढकलू शकतात.
वर्ल्ड कपच्या इतिहासातला भारत आणि न्यूझीलंडचा हा चौथा सामना आहे, जो रद्द झाला. याआधी पहिला सामना 7 जून रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रद्द झाला होता.त्यानंतर सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामना रद्द झाला, हा सामना केवळ 7.3 ओव्हर खेळला गेला होता. त्यानंतर श्रीलंका-बांगलादेश यांच्यातला सामना रद्द झाला होता. त्यामुळं चाहते आयसीसीवर आता संतापले आहेत. जर पावसामुळं सामने रद्द होणार असतील तर, खेळाडूंनी का खेळावे असा सवाल चाहते विचारत आहेत.
वाचा : World Cup : पाऊस पडणाऱ्या इंग्लंडमध्येच का घेतली स्पर्धा?
आयसीसीचा हा 12 वा क्रिकेट वर्ल्ड कप आहे. पहिल्या वर्ल्ड कपपासून आता पर्यंत इंग्लंडने सर्वाधिक 5 वेळा यजमानपद भूषवलं आहे. पहिले 3 वर्ल्ड कप इंग्लंडमध्येच झाले. त्यानंतर 1987 ला पहिला वर्ल्ड कप इंग्लंडबाहेर झाला तो म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये. त्यानंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात 1992 चा वर्ल्ड कप खेळवण्यात आला. पुन्हा भारतीय उपखंडात 1996 चा वर्ल्ड कप झाला.
वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा
वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?
वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का
SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?