जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 'या' अनकॅप्ड गोलंदाजावर फिदा! म्हणाला हा तर भारतीय संघाचं भविष्य

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 'या' अनकॅप्ड गोलंदाजावर फिदा! म्हणाला हा तर भारतीय संघाचं भविष्य

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार 'या' अनकॅप्ड गोलंदाजावर फिदा! म्हणाला हा तर भारतीय संघाचं भविष्य

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने (Ian Chappell) अनकॅप्ड वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या (umran malik) गोलंदाजीचे कौतुक केले आहे. चॅपलच्या मते, आयपीएलमुळेच भारताला उमरानसारखे सर्वोत्तम गोलंदाज मिळत आहेत. उमरानने आयपीएल 2022 मध्ये आपल्या वेगवान खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. जम्मू-काश्मीरचा हा युवा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिडनी, 8 मे : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेल (Ian Chappell) याने भारताच्या एका उभरत्या गोलंदाजाविषयी भविष्यवाणी केली आहे. इयान चॅपेल (Ian Chappell) असे मानतो की भारताच्या क्रिकेट आस्थापनेने गेल्या काही वर्षांत जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना तयार करण्यात संयम दाखवला आहे. मात्र, नजीकच्या भविष्यात उमरान मलिकच्या (umran malik) वास्तविक वेगाकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल. जागतिक क्रिकेटमधील सर्वात आदरणीय आवाजांपैकी एक असलेल्या चॅपेलने सांगितले की, आयपीएलच्या (IPL) आगमनाने भारताच्या “वेगवान गोलंदाजीमध्ये कमालीची खोली” निर्माण होण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम केलं आहे. यात कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चॅपलने ‘ESPNcricinfo’ च्या स्तंभात लिहिले, ‘भारतातील वेगवान गोलंदाजीची क्रांती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उमरान मलिकचे नाव आयपीएल पाहणाऱ्यांच्या हृदयात आहे. भूतकाळात, भारताने वेगवान गोलंदाज विकसित करण्यात संयम दाखवला आहे. परंतु, मलिकच्या वास्तविक वेगाकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. ‘वेग हेच सर्वस्व नाही, मेंदूही वापरावा लागतो’… विश्वविजेत्या गोलंदाजाने उमरान मलिकचे टोचले कान चॅपेलच्या म्हणण्यानुसार, ‘ज्या जगात वेगवान गोलंदाजीची कदर केली जाते, तेथे आता भारतातून अनेक स्टार्स बाहेर येत आहेत.’ आयपीएलने भारताला जागतिक क्रिकेटमधील एक प्रमुख शक्ती बनवण्यात खरोखर मोठी भूमिका बजावली आहे. “भारत सध्या एक मजबूत आंतरराष्ट्रीय संघ आहे आणि जर त्यांनी त्यासाठी आवश्यक असलेली उत्कटता दाखवली तर तो आघाडीचा संघ राहील,” असे चॅपन म्हणाले. या यशाबद्दल भारताने अत्यंत यशस्वी आयपीएलचे आभार मानले पाहिजेत. VIDEO: 12 सामने, 3 वेळा Golden Duck, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला झालंय तरी काय? भारताची वेगवान गोलंदाजी ही प्रतिस्पर्धी राष्ट्रांसाठी मत्सराची बाब आहे, असे चॅपल यांना वाटते. “जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सारख्या स्टार वेगवान गोलंदाजांच्या विकासाने परदेशात भारताची प्रतिष्ठा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गटात खोली आहे. संघाकडे इशांत शर्मा, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरसारखे पर्यायही आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात