मुंबई, 8 मे : विराट कोहली आयपीएलच्या 15 व्या हंगामात सातत्याने धावांसाठी संघर्ष करत आहे. आयपीएलच्या 54व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्याच चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्याच्या आयपीएलमध्ये विराट तिसऱ्यांदा 'गोल्डन डक'चा (golden duck) बळी ठरला आहे. सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिरकी गोलंदाज जगदीश सुचितने (Jagadeesha Suchith) कोहलीला (Virat Kohli) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विराटने सुचितच्या चेंडूवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जो शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने गेला आणि SRH कर्णधार केन विल्यमसनने तो पकडण्यात कोणतीही चूक केली नाही. विराट शून्यावर बाद झाल्याने त्याच्या नावावर होणारा मोठा विक्रम लांबला आहे.
एकूणच आयपीएलमध्ये विराट कोहली (Virat Kohli) सहाव्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. 2008 मध्ये पहिल्यांदा आशिष नेहराने त्याला गोल्डन डकचा बळी केलं होते. तेव्हा नेहरा मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. 2014 मध्ये पंजाब किंग्जचा गोलंदाज संदीप शर्माने तर 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईलने त्याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. या मोसमात लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने विराटला डीवाय पाटील, मुंबई येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात गोल्डन डकचा बळी बनवले होते. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज मार्को येनेसनने त्याला पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.
That wasn’t even a wicket taking bowl @stzarak #kohli https://t.co/sfznIhZ7PA
— kash (@kash8778) May 8, 2022
विराट कोहलीच्या 12 सामन्यात अवघ्या 216 धावा
33 वर्षीय विराट कोहलीने या मोसमात खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांमध्ये 216 धावा केल्या असून, 58 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. या दरम्यान कोहलीची सरासरी 19.64 तर स्ट्राइक रेट 111.34 आहे. चालू मोसमात कोहलीच्या बॅटमधून एकूण 20 चौकार आणि 4 षटकार आले आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये कोहली ओपनिंगसाठी क्रीझवर येत आहे. पण, आरसीबीचा हा बदल यशस्वी होताना दिसत नाही.
'विराट' विक्रमासाठी कोहलीला होती एका धावेची गरज! पण, केन विल्यमसनच्या सापळ्यात कसा झाला Golden Duck
आरसीबीचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. हैदराबाद संघाने दोन बदल करताना जगदीश सुचित आणि फजलहक फारुकी यांना संधी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: RCB, Virat kohli