मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीनं 7 वा. 29 मिनिटांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आणि...

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीनं 7 वा. 29 मिनिटांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आणि...

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni: 15 ऑगस्ट 2020 रोजी बरोबर 7 वाजून 29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आणि चाहत्यांना धक्का दिला. धोनीची निवृत्ती जाहीर केल्याच्या त्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे अनेक चाहते हळहळले होते.

  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 15 ऑगस्ट: टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीनं भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेलं. त्यानं पहिलंवहिलं टी20 विजेतेपद मिळवून दिलं. धोनीच्याच नेतृत्वात भारतानं 28 वर्षांनी वन डे विश्वचषक जिंकला. इतकच नव्हे तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार बनला. धोनीची कारकीर्द त्याच्या खेळीमुळे, त्याच्या मैदानातल्या कामगिरीमुळे चर्चेत राहिली तितकीच चर्चा झाली त्यानं अचानकपणे घेतलेल्या निर्णयांचीही. 2016 साली धोनीनं कर्णधारपद सोडलं आणि विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार झाला. त्यानं मग कसोटीतून निवृत्ती घेतली आणि वन डे, टी20 खेळत राहिला. पण धोनीनं दिलेला सर्वात मोठा धक्का होता तो त्यानं दोन वर्षांपूर्वी अचानकपणे घेतलेली निवृत्ती. आजच्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 2020 रोजी बरोबर 7 वाजून 29 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. आणि चाहत्यांना धक्का दिला.
View this post on Instagram

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

मै पल दो पल का शायर हूँ ने चाहते हळहळले... धोनीनं इन्स्टाग्रामवर त्याच्या कारकीर्दीतल काही महत्वाच्या क्षणांचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. आणि बॅकग्राऊंडला ‘मै पल दो पल का शायर हूँ’ हे गाणं वाजत होतं. आणि धोनीनं लिहिलं होतं की आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी मी निवृत्त होतोय. धोनीच्या या पोस्टमुळे त्याचे अनेक चाहते हळहळले होते. कारण 2019 सालच्या विश्वचषक सेमीफायनलनंतर धोनी एकही सामना खेळला नव्हता. 2021 चा टी20 वर्ल्ड कप खेळून तो निवृत्ती घेईल असं अनेकांना वाटलं होतं. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीचा निर्णय चटका लावून गेला. हेही वाचा - Asia Cup: आशिया चषकातील टॉप 5 खेळाडू, जे आहेत 'मॅन ऑफ द सीरीज'चे प्रबळ दावेदार आयपीएलमध्ये धोनीची जादू कायम धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये धोनीची क्रेझ कायम आहे. निवृत्तीनंतर पुढच्याच वर्षी चेन्नईला विजेतेपद मिळवून दिलं. धोनी सध्या 41 वर्षांचा आहे. पुढच्या मोसमात कदाचित तो शेवटची आयपीएल खेळेल. पण चाहत्यांच्या मनावर त्यानं केलेलं गारुड कायम राहिल.
First published:

Tags: Cricket, MS Dhoni

पुढील बातम्या