• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'R. Ashwin सारखा खेळाडू माझ्या संघात नको'; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

'R. Ashwin सारखा खेळाडू माझ्या संघात नको'; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

 अश्विनसारखा खेळाडू माझ्या संघात नको; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

अश्विनसारखा खेळाडू माझ्या संघात नको; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

केकेआर आणि दिल्लीमधील (DCvsKKR)काल झालेला सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला. दिल्लीला अखेरच्या षटकात 7 धावा वाचवायच्या होत्या, पण आर अश्विनच्या(R.Ashwin ) पदरी अपयश पडले. अश्विनच्या या खराब खेळीवर भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर तीव्र नाराजी व्यक्त करत खळबळजनक वक्तव्य केले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली,14 ऑक्टोबर : स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन(R.Ashwin ) बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स (KKRvsDC) विरुद्ध आयपीएल 2021 (IPL2021)च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC)मोठा खलनायक ठरला. दिल्लीला अखेरच्या षटकात 7 धावा वाचवायच्या होत्या, पण आर अश्विनच्या पदरी अपयश पडले. अश्विनच्या या खराब खेळीवर भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर तीव्र नाराजी व्यक्त करत खळबळजनक वक्तव्य केले आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना संजय मांजरेकर यांनी अश्विनच्या खराब खेळीवर भाष्य केले. टी २० स्पर्धेसाठी अश्विन योग्य गोलंदाज नाही. तुम्हाला वाटतं अश्विनच्या गोलंदाजीत फरक पडला पाहीजे. पण मला तसं वाटत नाही. कारण गेल्या पाच सात वर्षात त्याच्या गोलंदाजीत कोणताच फरक पडलेला नाही. हे वाचा- 12 वेळा पराभव, तरी तुटला नाही घमंड, भारताविरुद्धच्या मॅचआधी बाबरचा माईंड गेम! कसोटीसाठी तो उत्तम गोलंदाज आहे. मात्र टी २० साठी त्याची गोलंदाजी चालणार नाही. मला जर टर्निंग खेळपट्टी मिळाली, तर मी अश्विनला संघात कधीच घेणार नाही. मी वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरिनला संघात स्थान देईन. टी २० साठी अश्विन विकेट टेकिंग पर्याय नाही. मला वाटत नाही कोणतीही फ्रेंचाइसी त्याला आपल्या संघात फक्त धावगती कमी करण्यासाठी घेईल. असे खळबळजनक वक्तव्य मांजरेकर यांनी केले आहे. केकेआर आणि दिल्लीमधील काल झालेला सामना म्हणजे आयपीएलच्या इतिहासातील काही चुरशीच्या सामन्यांपैक एक ठरला. दिल्लीच्या 136 या सोप्या लक्षाचा पाठलाग केकेआरने उत्तम सुरु केला. एका क्षणी केकआरला 24 चेंडूत केवळ 13 धावांची गरज होती. सोबत त्यांच्या हातात 8 विकेट्सही होत्या. पण त्याच क्षणी दिल्लीच्या गोलंदाजानी जादूई गोलंदाजी करत केकेआरचे एक-एक फलंदाज तंबूत धाडले. एकाक्षणी 2 चेंडूत 6 धावांची गरज केकेआरला असतानाच राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
  Published by:Dhanshri Otari
  First published: