Elec-widget

क्रिकेटपटूचं आडनाव आहे की बारा डब्ब्यांची गाडी! बघा तुम्हाला तरी वाचता येतंय का?

क्रिकेटपटूचं आडनाव आहे की बारा डब्ब्यांची गाडी! बघा तुम्हाला तरी वाचता येतंय का?

हे आडनाव एकदा वाचून दाखवाच. तुमच्या तोंडाला येईल फेस.

  • Share this:

फिजी, 20 नोव्हेंबर : क्रिकेटच्या मैदानावर एखादा क्रिकेटपटू हा त्याच्या फलंदाजीसाठी किंवा गोलंदाजीसाठी ओळखला जातो. फार तर फार एक क्रिकेटपटू हा सर्वात जास्त धावांसाठी, चौकार-षटकारांसाठी, विकेट्ससाठी चर्चेत असतो. यात भारत आणि जगातल्या सर्व क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मात्र कधी एखाद्या क्रिकेटपटूचे आडनाव हा विक्रम असेल असे कधी ऐकले आहे का?

एखाद्या माणसासाठी आपले आडनाव हा एक प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा भाग असतो.

कधी कधी आपली ओळख ही आपल्या आडनावावरून होत असते. मात्र तुमचे आडनाव ही जर बारा डब्ब्यांची गाडी असेल पंचायतच आहे. असेच एका क्रिकेटपटूच्या बाबतही घडले. त्याचे आडनाव एवढे मोठे आहे की त्याच्या नावावर हा एक विक्रमच आहे. फिजीचा क्रिकेटपटू आय. एल. बुला. क्रिकेटपटू बुला यांनी 1947-18 आणि 1953-54मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यांचे नाव एवढे मोठे होते की, त्यांनी आय. एल. बुला असे टोपणनाव करून घेतले.

वाचा-धोनीच्या पत्नीसमोर स्टार अभिनेत्री फेल, HOT फोटोंमुळे सोशल मीडियावर धिंगाणा

दरम्यान फिजीचे क्रिकेटपटू बुला यांचे खरे नाव आहे, Ilikena Lasarusa Talebulamaineiilikenamainavaleniveivakabulaimainakulalakebalau. हे नाव वाचताना तुम्हाला दम लागला असेल नाही. महत्त्वाची गोष्ट या आडनावाचा एक अर्थही आहे. हे आडनाव लाऊ बेटसमूहासंबंधात आहे. याचा अर्थ आहे, ‘लाऊ ग्रुपमधल्या (लाऊ भेटसमूह) लॅकेबा बेटावरच्या नंकुला हॉस्पिटलमधून जिवंत परत आला’. हे आडनाव वाचून तुम्हाला कळणार नाही की ही भानगड नक्की काय आहे. पण हे आडनाव फार जून्या काळातले आहे.

Loading...

वाचा-अजिंक्य रहाणेला पडतायत 'गुलाबी' स्वप्न, विराट-शिखर म्हणाले...

वाचा-राष्ट्रपती राजवटीचं इंग्लंड कनेक्शन, 'या' क्रिकेटपटूनं 2014मध्ये केलं होतं भाकित

बुला हे ज्या काळी खेळायचे तेव्हा असे विचित्र आडनाव कोणाचेच नव्हते. कारण उच्चारासाठी क्रिकेटपटूंचे आडनाव महत्त्वाचे असते. एवढेच नाही तर फिजीच्या क्रिकेट इतिहासातील बुला हे एकमेवाद्वितीय खेळाडू होते. त्यांनी फिजीसाठी 9 सामने खेळले आणि या सर्व सामन्यांमध्ये मैदान गाजवलं. त्यांच्या तुफान षटकारांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 08:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com