रांची, 19 नोव्हेंबर : भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आपल्या दमदार खेळीसाठी प्रसिध्द आहे. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून धोनी क्रिकेटपासून दूर आहे. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत वेळ घालवत आहे. धोनी आणि साक्षी दोघंही कपल गोल्स म्हणून ओळखले जातात. धोनीला अडचणीच्या काळात सावरणाऱ्या साक्षीचा आज 31वा वाढदिवस आहे. धोनी आणि साक्षी या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमासारखी आहे. 4 जुलै 2010मध्ये धोनी आणि साक्षी विवाह बंधनात अडकले. मात्र त्यांचे प्रेम फुलले ते क्रिकेट दरम्यानच. धोनीच्या सिनेमातून या दोघांची प्रेम कहानी सर्वांसमोर आली असली तरी साक्षी ही सध्या स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिध्द आहे. साक्षी एका कंपनीची मालकिन असली तरी, सध्या परदेशात फिरणेही तिला आवडते.
दरम्यान, साक्षीच्या वाढदिवसानिमित्त धोनीनं एक रोमांटिक व्हिडीओ शेअर केला होता. यात साक्षी धोनीसोबत केक कापताना दिसत आहे. यातही साक्षी आपल्या बर्थ डे ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे.
साक्षी सोशल मीडियावर नेहमीच अक्टिव्ह असते. सोशल मीडियावर साक्षींने टाकलेल्या फोटोंमुळं सर्वांचे लक्ष सध्या तिनं वेधले होते. काही दिवसांपूर्वी साक्षी आपल्या खास मैत्रिणींसोबत इटलीमध्ये सुट्टी घालवत होती. यावेळी साक्षीनं परिधान केलेल्या कपड्यांची चर्चा होती.
यावेळी साक्षीने पिवळा रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करून आपल्या मैत्रिणींसोबत फोटो टाकले आहेत. साक्षीच्या ड्रेसची आणि स्टाईलचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
साक्षी इन्स्टाग्रामवर नेहमीच धोनी किंवा झिवासोबत फोटो टाकत असते. मात्र सध्या तिच्या स्टाईलमुळं साक्षी ट्रेंडमध्ये आहे. साक्षी एकटीच सुट्टीचा आस्वाद घेत होती.
साक्षीचे हे फोटो एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहेत. त्यामुळं साक्षी अनुष्काच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.

)







