Home /News /sport /

Chris Gayleचा संताप! आपल्याच माजी खेळाडूवर भडकला, म्हणाला- ‘जाऊन सांगा त्याला, मी त्याचा आदर करत नाही’

Chris Gayleचा संताप! आपल्याच माजी खेळाडूवर भडकला, म्हणाला- ‘जाऊन सांगा त्याला, मी त्याचा आदर करत नाही’

आपल्याच माजी खेळाडूवर भडकला Chris Gayle; म्हणाला, ‘जाऊन सांगा त्याला, मी त्याचा आदर करत नाही’

आपल्याच माजी खेळाडूवर भडकला Chris Gayle; म्हणाला, ‘जाऊन सांगा त्याला, मी त्याचा आदर करत नाही’

टी 20 वर्ल्डकपसाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल(Chris Gayle) ची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर त्यांचे कमबॅक झाले आहे. पण, काही लोकांच्या त्याची निवड ही पचनी पडलेली नाही. गेलने आता त्या लोकांना लक्ष्य केले आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: अवघ्या काही दिवसांत टी 20 वर्ल्डकप (T20 World Cup) सुरू होत आहे. दरम्यान, दोनदा या वर्ल्डकपचे प्रबळ दावेदार बनलेला वेस्ट इंडिजचा (West Indies)  संघ सध्या एका वादामुळे चर्चेत आला आहे. टी 20 वर्ल्डकपसाठी युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल(Chris Gayle) ची निवड करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर त्यांचे कमबॅक झाले आहे. पण, काही लोकांच्या त्याची निवड ही पचनी पडलेली नाही. गेलने आता त्या लोकांना लक्ष्य केले आहे. वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस(Curtly Ambrose) यांच्यावर त्याने निशाणा साधला आहे. काही दिवसापूर्वी, कर्टली अॅम्ब्रोस यांनी ख्रिस गेल हा माझी वैयक्तिक पसंती नाही. घरच्या मालिका (वेस्ट इंडीज) नुकत्याच खेळल्या, त्याला कोणतेही महत्त्व नव्हते, आणि मी त्याआधीच म्हटले आहे की जर त्याने त्या घरच्या मालिकेत चांगली कामगिरी केली नाही, तर त्याने वर्ल्डकपमध्ये जाऊ नये. असे मत एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते. अॅम्ब्रोस यांच्या याच मुद्दावर ख्रिस गेल बरसला आहे. हे वाचा- गोल्डन बॉय Neeraj Chopra चा हटके लुक व्हायरल नुकतंच ख्रिस गेलने एका रेडिओ स्टेशनला भेट दिली. तेव्हा त्याने अॅम्ब्रोस यांच्या वक्तव्यावर मत मांडले. मी तुम्हाला हे खासगीत सांगू शकतो आणि तुम्ही त्याला सांगू शकता की युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल अॅम्ब्रोसचा आदर करत नाही. मी अॅम्ब्रोसबद्दल बोलत आहे, मी अॅम्ब्रोसकडे निर्देश करत आहे, हो तुमचा अॅम्ब्रोस. जेव्हा मी वेस्ट इंडीज संघात आलो तेव्हा मला त्याच्याबद्दल खूप आदर होता. जेव्हा मी संघात आलो, तेव्हा मी त्याच्याकडून प्रेरणा घेत असे. पण मी आता माझ्या मनातलं बोलतोय. निवृत्त झाल्यापासून तो माझ्याविरोधात का बोलत आहे हे मला माहित नाही. माध्यमांमध्ये तो ज्या नकारात्मक गोष्टी सांगतो, त्याला केवळ लक्ष वेधायचे आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु तो लोकांचे लक्ष वेधून घेतो. म्हणूनच मी त्याला हवं ते अटेन्शन देत आहे.” तसेच तो पुढे म्हणाला, अॅम्ब्रोजशी माझे नाते संपले आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर नाही. जेव्हा जेव्हा मी त्याला भेटेन, तेव्हा मी म्हणेन की, इतके नकारात्मक राहणे थांबवा, वर्ल्डकपपूर्वी संघाला पाठिंबा द्या. हा संघ निवडला गेला आहे आणि आता आमच्या संघाला पाठिंबा देण्याची गरज आहे. आम्हाला नकारात्मक ऊर्जा नको आहे. इतर संघांचे माजी खेळाडू त्यांच्या संघांचे समर्थन करतात. आमच्या संघाचे खेळाडू हे का करू शकत नाहीत? आम्ही दोन वेळा वर्ल्डकप जिंकला आहे आणि आम्ही तिसऱ्यांदा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाहेर काय घडत आहे यावर टीम लक्ष ठेवून आहे. याचा परिणाम संघावर होईल. जर माजी खेळाडू संघाबद्दल नकारात्मक असतील तर ख्रिस गेल त्यांचा आदर करणार नाही असा इशारा त्याने यावेळी दिला आहे. हे वाचा- Sachin Tendulker च्या लेकीचा फोटो पाहून 'या'अभिनेत्याला पडली भुरळ गेल याने वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर वेस्ट इंडिज संघात पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज अशी त्याची ओळख आहे. ख्रिसने 2019मध्ये इंग्लंड विरुद्ध शेवटची टी-20 सामना खेळला होता. ख्रिस गेल याने 2006 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 58 आंतरराष्ट्रीय सामन्यात 32 च्या सरासरीने आणि 142 च्या स्ट्राईक रेटने 1627 धावा केल्या होत्या. यात दोन शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Chris gayle, T20 world cup

    पुढील बातम्या