मुंबई, 13 ऑक्टोबर: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) एकुलती एक लाडकी लेक सारा तेंडुलकर (Sachin Tendulkar’s daughter Sara Tendulkar)हिची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. साराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या या फोटोसोबत बी टाऊनचा अभिनेता कार्तिकची (kartik aaryan)चर्चा रंगली आहे. साराच्या फोटोवर आलेल्या कार्तिकच्या लाईकनं सर्वांचंच लक्ष वेधले. इतकंच नव्हे, तर अनेक चर्चांना उधाणही आले आहे. सारा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच तिने एक आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये सारा बाल्कनीमध्ये उभी दिसत आहे. चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे. तिचा हा फोटो अभिनेता कार्तिक आर्यनच्याही पसंतीस पडला असून, त्यानंही हा फोटो लाईक केला आहे.
दरम्यान, सारा सध्या मुंबई आणि लंडनमध्ये ये- जा करत आहे. मुंबईत तिचं संपूर्ण कुटुंब असून, लंडनमध्ये ती वैद्यकिय क्षेत्रातील शिक्षण घेत आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिनं शालेय शिक्षण पूर्ण करत उच्चशिक्षणासाठी परदेशाची वाट धरली. सारा दिसायला अतिशय सुंदर असून, क्रिकेट जग आणि मनोरंजन सृष्टीतही ती चर्चेत असते. मध्यंतरी टीम इंडिया आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघातील खेळाडू शुभमन गिल (Shubhaman Gill) याच्यासोबत तिचे अफेअर सुरू असल्याची अफवा आहे, मात्र दोघांनीही याबाबत कबुली दिलेली नाही की या गोष्टीचा इन्कार केलेला नाही. अनंत अंबानी याच्यासोबतही तिचे नाव जोडले जाते. सारा सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे फॅन फॉलोइंग प्रचंड असून, इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे तब्बल 14 लाख फॉलोअर्स आहेत.