मुंबई, 28 जानेवारी : क्रीडा प्रेमींसाठी रविवारी मोठी मेजवानी असणार आहे. दोन वर्ल्ड कप फायनल, ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीची फायनल याशिवाय इतर सामने असणार आहेत. यात हॉकी आणि अंडर १९ महिला क्रिकेट वर्ल्ड कप, भारत विरुद्ध न्यूझीलंड टी २० सामना असणार आहे. तर बीग बॅश लीग, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला एकदिवसीय सामनाही असेल.
U19 Womens World Cup
अंडर १९ महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे. सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. दोन्ही संघ पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावण्याच्या इराद्याने उद्या मैदानात उतरतील. सायंकाळी सव्वा पाच वाजता हा सामना सुरू होणार असून स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ वरून याचे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.
Australian Open
ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचा अंतिम सामना बेलारूसच्या सबालेंकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरलं. आता रविवारी पुरुष एकेरीचा अंतिम सामना नोवाक जोकोविच आणि त्सित्सीपास यांच्यात रंगणार आहे. दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होणार आहे. सोनी सिक्सवर हा सामना पाहता येईल.
हेही वाचा : सबालेंकाने पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद, पहिल्यांदाच कोरलं ग्रँड स्लॅमवर नाव
Hockey World Cup
यंदाच्या हॉकी वर्ल्ड कपचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. भारताला क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरण्यात अपयश आले. मात्र ९ ते १३ व्या क्रमांकासाठी भारत लढत आहे. दरम्यान, अंतिम सामना रविवारी सायंकाळी ७ वाजता बेल्जियम आणि जर्मनी यांच्यात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स फर्स्ट वरून होणार आहे.
Big Bash League
बीग बॅश लीगच्या एलिमिनेटर राउंडमध्ये रविवारी ब्रिस्बेन आणि मेलबर्न यांच्यात सामना होणार आहे. दुपारी पावणे दोन वाजता ही लढत सुरू होईल. सोनी टेन १ चॅनेलवर याचे प्रक्षेपण होईल.
IND vs NZ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका सुरु असून यातील दुसरा सामना २९ जानेवारी रोजी रविवारी होणार आहे. सायंकाळी सात वाजता स्टार स्पोर्ट्स वन चॅनेलवर हा सामना पाहता येईल. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा : सानिया मिर्झाकडे कोट्यवधींची संपत्ती, टेनिस अकादमीची मालकीण अन् लक्झरी कार्सचा छंद
ENG vs SA
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स सिलेक्टवर पाहता येईल.
FA Cup
एफए कपमध्येही उद्या लीवरपूल आणि ब्रिजटन यांच्यात सामना होणार आहे. पहाटे दीड वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी टेन २ वरून होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Football, Hockey, Hockey World Cup 2023