मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सबालेंकाने पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद, पहिल्यांदाच कोरलं ग्रँड स्लॅमवर नाव

सबालेंकाने पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद, पहिल्यांदाच कोरलं ग्रँड स्लॅमवर नाव

aryna sabalenka

aryna sabalenka

पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत सबालेंकाने विजेतेपदावर नाव कोरलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सिडनी, 28 जानेवारी : ऑस्ट्रेलियन ओपन 2023 च्या महिला एकेरीचे विजेतेपद बेलारूसच्या अरीना सबालेंका हिने पटकावलं. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत सबालेंकाने विजेतेपदावर नाव कोरलं. सबालेंकाने कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिना हिचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. रायबाकिनाने 6-4 गुणांसह पहिल्या सेटमध्ये बाजी मारली होती. मात्र त्यानतंर पुनरागमन करत सबालेंकाने दोन्ही सेट जिंकले. सबालेंकाचं हे पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

सबालेंका आणि रायबाकिना यांच्यातील ही चौथी लढत होती. या चारही लढतीत सबालेंकाने विजय मिळवला होता. मात्र दोघीही पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये आमने सामने आल्या होत्या. याआधी रायबाकिना आणि सबालेंका जुलै 2021 मध्ये विंबल्डनच्या चौथ्या फेरीत एकमेकींविरोधात लढल्या होत्या. तर जानेवारी 2021 मध्ये अबुधाबी टेनिस ओपनमध्ये त्यांची लढत झाली होती. वुहान ओपन 2019 च्या क्वार्टर फायनलमध्येही दोघी आमने-सामने आल्या होत्या.

हेही वाचा : सानिया मिर्झाकडे कोट्यवधींची संपत्ती, टेनिस अकादमीची मालकीण अन् लक्झरी कार्सचा छंद

रायबकिनाने आतापर्यंत एका ग्रँड स्लॅमसह तीन विजेतेपदं पटकावली आहेत. तर सबालेंका याआधी अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये फक्त एक सेट गमावला. याव्यतिरिक्त पूर्ण स्पर्धेत तीने एकही सेट गमावला नव्हता.

First published:

Tags: Tennis player