VIDEO: सूर्यकुमार यादवच्या आऊट ऑफ द पार्क सिक्सवर हार्दिक पांड्याची Reaction Viral

VIDEO: सूर्यकुमार यादवच्या आऊट ऑफ द पार्क सिक्सवर हार्दिक पांड्याची Reaction Viral

पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 रन्स काढले. यादरम्यान त्याने एक सिक्स मारला. हा सिक्स पाहून हार्दिक पांड्याने दिलेली रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 एप्रिल : 30 वर्षीय भारतीय बॅट्समॅन सूर्यकुमार यादवने आयपीएल 2021 सीजनची धडाकेबाज सुरुवात केली आहे. सूर्यकुमारने आयपीएलच्या काही दिवसापूर्वीच इंग्लंडविरूद्धच्या टी 20 सीरीजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

चेन्नईत कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) दरम्यान आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतला दुसरा सामना खेळवला गेला. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 56 रन्स काढले. यादरम्यान त्याने एक सिक्स मारला. हा सिक्स पाहून हार्दिक पांड्याने दिलेली रिअ‍ॅक्शन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. स्पोट्सविकी वेबसाईटने हे वृत्त दिलं आहे.

मुंबई इंडियन्सचा स्कोर 9.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवून 73 रन होता. क्रिजवर सूर्यकुमार यादव होता. पॅट कमिन्स इनिंगची 10वी ओव्हर टाकत होता. कमिन्सच्या पाचव्या बॉलवर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)एक उत्तुंग शॉट मारला जो थेट मैदानाबाहेरच जावून पडला.

(वाचा - IPL 2021 : 13 वर्षात जमलं नाही ते 2 सामन्यात केलं, मुंबईच्या कामगिरीवर 'डाग')

यादवच्या या शॉटनंतर डग आऊटमध्ये बसलेल्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya)आश्चर्यकारक रिअ‍ॅक्शन पाहण्यासारखी होती. सूर्यकुमार यादवच्या या सिक्ससोबतच हार्दिकच्या रिअ‍ॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा सिक्स पाहिल्यावर डग आउटमध्ये हार्दिकने हात उंचावून जोरजोरात टाळ्या वाजवून सूर्यकुमारला दाद दिली. हार्दिकची रिअ‍ॅक्शन अनेक युजर्सनी शेअर केली आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने अगोदर बॅटिंग करून सूर्यकुमार यादवच्या 56 रनच्या आणि कॅप्टन रोहित शर्माच्या 43 रनच्या मदतीने 20 ओव्हरमध्ये सर्वबाद 152 रन्सचं टार्गेट कोलकात्याला दिलं. पहिल्या इनिंगमध्ये शानदार बॉलिंग करत 2 ओव्हरमध्ये केवळ 15 रन देत आंद्रे रसलने 5 विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम सुरुवातीला खूप मजबूत स्थितीत दिसत होती. मात्र, मुंबईच्या राहुल चहरने शानदार बॉलिंग करून कोलकात्याच्या 4 विकेट घेतल्या आणि टीमला बॅकफूटवर ढकललं. कोलकात्याकडून नितीश राणाने 57 रन केले, तर शुभमन गिलने (Shubaman Gill) 33 रन केले. या शिवाय कोणताच बॅट्समॅन दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.

(वाचा - लागोपाठ तिसऱ्या महिन्यात भारतीय क्रिकेटपटूने पटकावला ICC चा पुरस्कार)

कोलकात्याची टीम 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या बदल्यात केवळ 142 रन काढू शकली आणि 10 रनने मुंबई इंडियन्सने ही मॅच जिंकली. राहुल चहरला‘मॅन ऑफ द मॅच’ (Man of the Match)पुरस्कार देण्यात आला. मुंबईचा हा या सीजनमधील पहिला विजय आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या पराभव केला होता.

First published: April 14, 2021, 11:59 AM IST

ताज्या बातम्या