मुंबई, 12 एप्रिल: आयपीएल 15 व्या (IPL 2022) सीझनमधील 21 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs GT)यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात अनेक घटना घडल्या असल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा वेगवान बाउन्सर थेट हार्दिकच्या हेल्मेटवर (Hardik Pandya helmet) आदळला. हे पाहताच पांड्याला चिअर करण्यासाठी आलेली त्याची पत्नी नताशाला (Nataša Stanković) धक्का बसला. सध्या तिची रिअॅक्शनच चर्चेत आहे. सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शन बाद झाल्यानंतर मैदानात उतरला. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर हार्दिकने वेगवान गोलंदाज टी नटराजनला चौकार मारला. पांड्या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला, पण वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याचा एक चेंडू त्याच्या हेलमेटला जाऊन लागला. उमरानने हा चेंडू साधारणतः 140 किमी ताशी वेगान टाकला असावा, ज्याचा हार्दिकला लवकर अंदाज आला नाही. परिणामी हा वेगात आलेला चेंडू त्याच्या हेलमेटला जाऊन आदळला.
उमरानने टाकलेला हा खतरनाक बाउंंसर हेलमेटवर लागल्यानंतर हार्दिक हैराण झाल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने त्याला कोणती गंभीर दुखापत झाली नाही. त्याने तत्काळ तो ठीक असल्याची पुष्टी केली. पण त्याची पत्नी नताशा घाबरली असल्याचे पाहायला मिळाले. कॅमेरामनने तिच्या चिंतेचा चेहरा कॅमेरात कैद केला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिक्स मारला अन् अचानक खाली कोसळला राहुल त्रिपाठी, मॅच सोडून परतावं लागलं पव्हेलियनमध्ये; पाहा काय घडलं त्यानंतर हार्दिकने त्याचा बदला घेतला असल्याचे पाहायला मिळाले. उमरानने टाकलेल्या पुढच्या दोन्ही चेंडूवर हार्दिकने चौकार ठोकले. संघ अडचणीत असताना हार्दिक पांड्याने हैदराबाद विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. आयपीएलमधील 17 डावानंतर त्याच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने 42 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावांची नाबाद खेळी केली. भात्यातील फटकेबाजी आणि गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असल्याचे दाखवून दिले.