Home /News /sport /

'निवडकर्त्यांनी 'कुल-चा' जोडी का फोडली'? T20 WC मध्ये मिळावी संधी, माजी दिग्गज खेळाडू म्हणतो..

'निवडकर्त्यांनी 'कुल-चा' जोडी का फोडली'? T20 WC मध्ये मिळावी संधी, माजी दिग्गज खेळाडू म्हणतो..

IPL 2022: कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी आतापर्यंत आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. चहलने 22 तर कुलदीपने 18 विकेट घेतल्या आहेत. तर या हंगामात दोघेही नव्या संघांकडून खेळत आहेत. 'कुल-चा' जोडीच्या या दमदार कामगिरीनंतर माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने या दोघांचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्याची मागणी केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मे : गेल्या वर्षी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने टी-20 विश्वचषकाद्वारे मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन केले. तो वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांच्यासोबत निवडला गेला होता. आता विश्वचषक जवळ आला आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन प्रसिद्ध चेहऱ्यांनी संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. ही कुल-चा जोडी आहे. म्हणजे चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep yadav) आणि युझवेंद्र चहल (yuzvendra chahal). या दोन फिरकीपटूंसाठी आतापर्यंत आयपीएल 2022 चांगले राहिले आहे. एकीकडे चहल 22 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याचबरोबर या यादीत कुलदीप 18 विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. परिणामी आता फिरकी गोलंदाजांची संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. या दोन्ही गोलंदाजांनी आयपीएल 2022 मध्ये संस्मरणीय कामगिरी केली आहे. चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक घेत 5 विकेट्स घेण्याची किमया साधली. तर दुसरीकडे, कुलदीप नवीन फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससाठी चार वेळा सामनावीर ठरला. त्यामुळेच भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने (Harbhajan Singh) यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या संघात पुनरागमन करण्याविषयी बोलला आहे. 'कुल-चा'ची जोडी का फोडली माहीत नाही? : हरभजन हरभजन सिंग एका लाँच इव्हेंटमध्ये म्हणाला, "मला माहित नाही की त्यांनी (निवडकर्ते) भारतासाठी चांगली कामगिरी करत असलेली जोडी का फोडली. मला खात्री आहे की तुम्हाला 'कुल-चा', कुलदीप आणि युझवेंद्रला परत आणावे लागेल, मला वाटते की ते टीम इंडियासाठी उत्कृष्ट ठरले आहेत. जेव्हा-जेव्हा ते एकत्र खेळले आहेत तेव्हा त्यांनी मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या आहेत. मग ते T20, ODI किंवा इतर कोणतेही फॉरमॅट असो. ते जेव्हा एकत्र खेळले तेव्हा नेहमीच यशस्वी झाले." 'विराट' विक्रमासाठी कोहलीला होती एका धावेची गरज! पण, केन विल्यमसनच्या सापळ्यात कसा झाला Golden Duck चहलच्या आयपीएल 2022 मध्ये 22 विकेट आयपीएलच्या 15व्या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या नेत्रदीपक कामगिरीमागे युझवेंद्र चहलचा महत्त्वाचा वाटा आहे. मेगा लिलावापूर्वी त्याला आरसीने कायम ठेवले नव्हते. पण राजस्थान रॉयल्सने या लेगस्पिनरला 6.50 कोटी रुपयांना लिलावात सामील करून घेतले. तो अप्रतिम गोलंदाजी करत आहे. LSG v KKR Match : लखनौ सुपर जायंट्सकडून KKR चा 75 धावांनी धुव्वा! अव्वल स्थानी झेप जर आपण कुलदीपबद्दल बोललो तर या चायनामन गोलंदाजाने आयपीएल 2020 मध्ये केकेआरसाठी फक्त 5 सामने खेळले आणि 2021 मध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण दिल्ली कॅपिटल्समध्ये येताच कुलदीपचा खेळ बदलला आणि त्याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात एकाच वेळी 4 विकेटसह एकूण 18 बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टी-20 विश्वचषकासाठी खेळाडूंची निवड झाली, तर या दोन्ही खेळाडूंच्या पुनरागमनाची आशा खूप प्रबळ आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Harbhajan singh, Kuldeep yadav, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या