मुंबई, 8 मे : दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब फॉर्मशी झुंजणारा माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या 15 व्या हंगामात धावा काढण्यासाठी संघर्ष करत आहे. रविवारी विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद होऊन आयपीएलच्या इतिहासातील पाचव्यांदा गोल्डन डक आउट झाला. मात्र, याहीपेक्षी वाईट गोष्ट अशी आहे, की कोहलीने आज एक धाव काढली असती तर त्याच्या नावावर नवीन विक्रम नोंदवला गेला असता. पण, केन विल्यमसनच्या सापळ्यात तो अलगद अडकला. चला सविस्तर जाणून घेऊ. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने आयपीएल 2022 मध्ये भलेही धावा केल्या नसतील. परंतु, तरीही तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर आहे. एवढेच नाही तर विराट कोहलीने आज म्हणजेच रविवारी 8 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एक धाव जरी काढली तर तो आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम आपल्या नावावर करणार होता. मात्र, आता यासाठी कोहली आणि त्याच्या चाहत्यांना पुढच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. LSG v KKR Match : लखनौ सुपर जायंट्सकडून KKR चा 75 धावांनी धुव्वा! अव्वल स्थानी झेप उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहली SRH विरुद्धची पहिली धाव पूर्ण करताच IPL च्या इतिहासात 6500 धावा करणारा पहिला फलंदाज होणार होता. फ्रँचायझी T20 लीगमध्ये कोणत्याही फलंदाजाने इतक्या धावा केल्या नाहीत. आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी खेळतानाही विराट कोहलीने इतक्या धावा केल्या आहेत, ही एक मोठी गोष्ट आहे. विराट कोहलीने आतापर्यंत 218 सामन्यांच्या 210 डावांमध्ये 36.51 च्या सरासरीने 6499 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतके आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. या लीगमध्ये त्याने 566 चौकार आणि 214 षटकार मारले आहेत. विराट कोहली आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा पहिला खेळाडू होता आणि आता तो 6500 धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याच्यानंतर शिखर धवनने या लीगमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. राजस्थानच्या ‘रॉयल्स’ विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफ शर्यतीतून कशी पडली बाहेर? जाणून घ्या केन विल्यमसनच्या सापळ्यात अडकला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू आहे. आरसीबी 6 सामने जिंकून IPL 2022 गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. त्याचवेळी हैदराबादने सलामीचा सामना गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केलं आहे. त्यांनी 5 सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अशा मोक्याच्या क्षणी विराट कोहली शून्यवर बाद होणे संघासाठी मोठा धक्का आहे. हैदराबाद संघात भुवनेश्वर कुमार सारखे वेगवान गोलंदाज असताना कर्णधार केन विल्यमसने जगदीश सुचित या फिरकीपटूकडे चेंडू सोपावला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला अन् विराट कोहली बाद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.