जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / LSG v KKR Match : लखनौ सुपर जायंट्सकडून KKR चा 75 धावांनी धुव्वा! अव्वल स्थानी झेप

LSG v KKR Match : लखनौ सुपर जायंट्सकडून KKR चा 75 धावांनी धुव्वा! अव्वल स्थानी झेप

LSG v KKR Match : लखनौ सुपर जायंट्सकडून KKR चा 75 धावांनी धुव्वा! अव्वल स्थानी झेप

LSG v KKR : विकेटकीपर सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकांत 7 बाद 176 धावा केल्या. डी कॉकने 29 चेंडूत 50 धावा केल्या तर दीपक हुडाने 27 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले. केकेआरकडून आंद्रे रसेलने दोन बळी घेतले.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 7 मे : लखनौ सुपर जायंट्स संघाने (Lucknow Super Giants) आयपीएलच्या 53व्या सामन्यात 75 धावांनी मोठा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. लखनौने ठेवलेल्या 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरचा (Kolkata Knight Riders) संघ 14.3 षटकांत 101 धावांत गारद झाला. लखनौ सुपर जायंट्सकडून वेगवान गोलंदाज आवेश खान आणि जेसन होल्डरने 3-3 बळी घेतले. आवेशला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. लखनौ सुपर जायंट्सचा 11 सामन्यांमधला हा आठवा विजय आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे 11 सामन्यांत 8 विजय मिळवून 16 गुण झाले आहेत. गुजरात टायटन्सचेही 16 गुण आहेत. पण, नेट रनरेटच्या बाबतीत लखनौचा संघ वरचढ ठरला आहे. त्याचबरोबर केकेआरचा हा अकरा सामन्यांमधील सातवा पराभव आहे. कोलकात्याच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. एकूण धावसंख्येमध्ये एकही धाव जोडली गेली नव्हती की मोहसीन खानने सलामीवीर बाबा इंद्रजीतला आयुष बडोनीकडे झेलबाद करून केकेआरला मोठा धक्का दिला. कर्णधार श्रेयस अय्यरही 11 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. वैयक्तिक 6 धावांवर श्रेयस दुस्मंथा चमीराच्या गोलंदाजीवर बडोनीकरवी झेलबाद झाला. अॅरॉन फिंच 14 धावा करून बाद झाला. जेसन होल्डरच्या चेंडूवर तो यष्टिरक्षक डी कॉककरवी झेलबाद झाला. आंद्रे रसेल 19 चेंडूत 45 धावा करून बाद नितीश राणाच्या रूपाने केकेआरने चौथी विकेट गमावली. 2 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर आवेश खानने नितीशला बोल्ड केले. केकेआरने 25 धावांवर चौथी विकेट गमावली. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंगला रवी बिश्नोईने क्रुणाल पांड्याकरवी झेलबाद केले. रिंकूने 10 चेंडूत 6 धावा केल्या. आंद्रे रसेलने 19 चेंडूत 45 धावा केल्या. मात्र, आवेश खानने त्याचा डाव संपवला. अनुकुल रॉय खाते न उघडताच बाद झाला. राजस्थानच्या ‘रॉयल्स’ विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफ शर्यतीतून कशी पडली बाहेर? जाणून घ्या तत्पूर्वी, या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी केली आणि डाव सुरू होताच संघाला सर्वात मोठा धक्का बसला. कर्णधार केएल राहुल (KL Rahul) एकही चेंडू न खेळता शून्यावर धावबाद झाला. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जेव्हा क्विंटन डी कॉकने चेंडू हलकेच ढकलला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केएल राहुलही धावला. पण, कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर उभा असलेला चेंडू पकडला आणि रॉकेट थ्रो मारला जो थेट मधल्या स्टंपला लागला. सामना सुरू झाल्यानंतर केएल राहुल केवळ 4 मिनिटेच क्रीजवर राहू शकला. केएल राहुल क्रीजच्या खूप मागे राहिला आणि एकही चेंडू न खेळता बाद झाला. केएल राहुलच्या या विकेटला डायमंड डक म्हटले जाईल, कारण त्याने एकही चेंडू खेळला नाही आणि एकही धाव काढली नाही. ‘हे’ परदेशी क्रिकेटर्स आहेत भारताचे जावई, दोन पाकिस्तानी प्लेयर्सचाही समावेश लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलचा या मोसमात हा तिसरा शून्य आहे. या मोसमाच्या सुरुवातीला केएल राहुलला गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध खातेही उघडता आले नव्हते. तीन शून्य असूनही, केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्ससाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. आयपीएल 2022 मध्ये, केएल राहुलने 11 सामन्यांमध्ये 451 धावा केल्या आहेत, ज्या दरम्यान त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. केएल राहुलने या मोसमात आतापर्यंत 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे, जोस बटलर पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत 600 हून अधिक धावा केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात