Home /News /sport /

आफ्रिदीच्या मोहिमेत सहभागी झाला हरभजन सिंग, आधी आपल्या देशाचं बघा असा नेटकऱ्यांचा सल्ला

आफ्रिदीच्या मोहिमेत सहभागी झाला हरभजन सिंग, आधी आपल्या देशाचं बघा असा नेटकऱ्यांचा सल्ला

भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पाकचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीमुळे ट्रोल होत आहे.

    मुंबई, 29 मार्च : भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग पाकचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीमुळे ट्रोल होत आहे. हरभजन सिंगने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर हरभजनला टीकेला सामोरं जावं लागलं. त्यामध्ये हरभजनने शाहिद आफ्रिदीच्या फाउंडेशनला कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मदत कऱण्याचं आवाहन केलं होतं. याशिवाय त्यानं यात आफ्रिदीचं कौतुकही केलं आहे यामुळेच चाहत्यांनी त्याला आधी भारतात बघ असं म्हटलं. व्हिडिओमध्ये हरभजनने म्हटलं की, जगात या व्हायरसनं अनेकांचे जीव गेले आहेत. मग त्यता भारत , अमेरिका, पाकिस्तान, इटली, स्पेन यासह अनेक देशांत कोरोनामुळे लोक त्रस्त आहे. आता सर्व माणसांनी एकत्र यायला हवं. एकमेकांची मदत करायला हवी. शाहिद आफ्रिदीच्या फाउंडेशननं चांगलं काम केलं आहे. त्याच्या माणुसकीसाठी अभिनंदन. तुम्हीही त्याच्या या कामात हातभार लावू शकता. शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरवर एक मोहिम सुरू केली आहे. त्याची सुरुवात करताना #DonateKarona मोहिम उघडली. यात तीन क्रिकेटपटूंना टॅग केलं. आफ्रिदीने यात लोकांना कोरोनापासून वाचण्याच्या टिप्स शेअर करण्यास सांगितलं आहे आणि सोबत तिघांना टॅग करा असं म्हटलं. आफ्रिदीने हरभजन सिंग, ख्रिस जॉर्डन आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिराल टॅग केलं आहे. हे वाचा : Coronavirus मुळे एमएस धोनी समोर सगळ्यात मोठा धोका जगभर पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत 30 हजार नागरिकांचे प्राण घेतले आहेत. चीनपासून अमेरिकेपर्यंत अनेक देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. फक्त इटलीत मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा जास्त आहे. भारतातही कोरोना पसरत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 1000 झाली आहे तर मृतांची संख्या 24 वर पोहोचली आहे. हे वाचा : धोनीला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारे 'DSP' आता कोरोना वॉरियर्स, ICCनही केलं कौतुक
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus, Shahid Afridi

    पुढील बातम्या