मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'त्याने कोणताही गुन्हा केला नाही' हरभजन सिंहने के एल राहुलची केली पाठराखण!

'त्याने कोणताही गुन्हा केला नाही' हरभजन सिंहने के एल राहुलची केली पाठराखण!

हरभजन सिंहने के एल राहुलची केली पाठराखण!

हरभजन सिंहने के एल राहुलची केली पाठराखण!

माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात केएल राहुल वरून सुरु असलेल्या ट्विटर वॉरमध्ये आता भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने उडी घेतली आहे. त्याने खराब फॉर्ममधून जात असलेल्या राहुलबद्दल एक ट्विट करून पाठराखण केली.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 फेब्रुवारी : भारताचा स्टार क्रिकेटपर के एल राहुल सध्या अत्यंत वाईट फॉर्मात आहे. वारंवार संधी मिळून देखील तो अपयशी ठरत असल्याने नेटकऱ्यांकडून त्याला जोरदार ट्रॉल केलं जात आहे. अशातच माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांच्यात केएल राहुल वरून सुरु असलेल्या ट्विटर वॉरमध्ये आता भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह याने उडी घेतली आहे. त्याने खराब फॉर्ममधून जात असलेल्या राहुलची पाठराखण केली.

के एल राहुल हा भारतीय संघातून खेळत असताना वारंवार मोठी धाव संख्या करण्यासाठी अपयशी ठरत असल्याने त्याला नेटकऱ्यांकडून मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी  व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा हे यांच्यात के एल राहुल वरून ट्विटर वॉर रंगले होते. व्यंकटेश प्रसादने केएल राहुलला संघातून बाहेर काढत शुभमन गिलला संधी देण्याची मागणी केली आहे. तर समालोचक आणि माजी सलामीवीर आकाश चोप्राने केएल राहुलला अजून संधी मिळावी यासाठी त्याची पाठराखण केली. यावादामुळे भारतीय क्रिकेट विश्वातील वातावरण गरम होत असताना हरभजनने यात उडी घेत सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे ही वाचा : वडापाव पासून पिझ्झापर्यंत; भारतीय क्रिकेटर्सना आवडतात हे पदार्थ

भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंहने त्याच्या अकाऊंटवरून ट्विट करत म्हंटले, "आपण केएल राहुलला थोडा काळ एकटं सोडू शकतो का? त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तो अजूनही अव्वल खेळाडू आहे. तो जोरदार पुनरागमन करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सर्वजण अशा पॅचमधून जातो. तो पहिला आणि शेवटचा नाही. त्यामुळे कृपया तो आपला भारतीय खेळाडू आहे या वस्तुस्थितीचा आदर करा आणि विश्वास ठेवा".

रविवारी दिल्ली येथे झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात के एल राहुल कडून भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असताना, तो केवळ एक धाव करून बाद झाला होता. त्याच्यामुळे त्याडावात संघाची सुरुवात खराब झाली. यानंतर के एल राहुल याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Cricket news, Harbhajan singh, India vs Australia, Kl rahul, Team india