मुंबई, 4 जुलै: टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनं
(Harbhajan Singh) शुक्रवारी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. गेल्या दोन दशकांपासून भारतीय क्रिकेट गाजवणारा हरभजन लवकरच नव्या इनिंगमध्ये दिसणार आहे. त्याच्या वाढदिवशी या इनिंगची एक झलक दिसली.
हरभजनचा पहिला सिनेमा फ्रेंडशिपचे
(Friendship) पोस्टर त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमात हरभजनची मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबर अर्जुन सरजा आणि विनोदी कलाकार सतीश यांच्याही भूमिका आहेत. हरभजननं यापूर्वी 'मुझसे शादी करोगी' या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. मात्र त्याची मुख्य भूमिका असलेला हा पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगु या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यावेळी या सिनेमातील एक गाणे देखील प्रदर्शित करण्यात आले. या सिनेमात हरभजननं मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची भूमिका केली आहे.
हरभजनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये 103 टेस्ट, 236 वन-डे आणि 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने टेस्टमध्ये 417, वन-डेमध्ये 269, तर टी20मध्ये 25 विकेट्स घेतल्या आहेत. 2007 मधील टी20 वर्ल्ड कप आणि 2011 मधील वन-डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा तो सदस्य होता.
झूलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये लीड रोल करणार 'ही' अभिनेत्री, क्रिकेटशी आहे जवळचा संबंध
मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्सकडून (CSK) आयपीएल स्पर्धेत खेळल्यानंतर तो या सिझनमध्ये पहिल्यांदाच कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत आहे. सप्टेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये हरभजन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.