मुंबई, 4 जुलै : महिला क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त विकेट घेणारी एकमेव क्रिकेटपटू झूलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) बायोपिकवर लवकरच काम सुरु होणार आहे. याबाबतच्या रिपोर्टनुसार टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या सिनेमात मुख्य भूमिका करणार आहे. (फोटो – PTI)
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार या बायोपिकचं शूटिंग डिसेंबर महिन्यात सुरु होईल. जानेवारी 2020 मध्ये अनुष्का भारतीय टीमच्या जर्सीमध्ये झुलनसोबत कोलकातच्या इडन गार्डन स्टेडियमवर दिसली होती. अनुष्काचा यापूर्वीचा सिनेमा 2018 साली प्रदर्शित झाला होता. (फोटो-@JhulanG10)
झूलन गोस्वामीनं जानेवारी 2002 मध्ये इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वन-डे क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारी ती एकमेव महिला बॉलर आहे. (फोटो-@JhulanG10)
‘चकदहा एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या झूलननं बॉल गर्ल म्हणून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. (फोटो-@JhulanG10)
मिताली राज आणि झूलन गोस्वामी या भारताकडून सर्वाधिक काळ टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटू आहेत. इंग्लंड विरुद्ध जून महिन्यात झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी हा विक्रम केला. भारताकडून त्यांच्यापेक्षा फक्त सचिन तेंडुलकर जास्त काळ टेस्ट क्रिकेट खेळला आहे. (फोटो-@JhulanG10)
झूलनचा 2007 साली आयसीसीसी ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. तिचा 2010 साली अर्जुन आणि 2012 साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. (फोटो-@JhulanG10)