मुंबई, 3 मे: रमजान ईद (Ramadan Eid) या सणाने रमजान महिन्याची सांगता केली जाते. महिनाभर रोजे ठेवत अर्थात खास उपवासांच्या माध्यमातून प्रार्थना केली जाते. यंदा रमजान ईद 30 रोजे पूर्ण करत 3 मेला साजरी करण्यात येत आहे. अशातच, आयपीएलच्या महाकुंभात नव्याने पदर्पण केलेल्या गुजरात टायटन्स (GT) संघाने ईद साजरी केली आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशीद खानने स्वतःच्या हाताने खास पदार्थ बनवत आपल्या सहकारी खेळाडूंना खाऊ घातला आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी या गुजरातच्या संघाने गुजरात स्थापन दिवस साजरा केला. आता या संघाने ईद साजरी केली आहे. ज्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. गुजरातच्या संघाने आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राशीद खान ईदनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसाठी खास पदार्थ बनवताना दिसत आहे. राशिदने अफगाणिस्तानचा फेमस पदार्थ रोश बनवला आहे. तसेच त्यांना हा नवा पदार्थ बनवत असताना त्याची रेसिपीदेखील सांगितली आहे. हा पदार्थ तयार झाल्यानंतर पहिल्यांदा कसा झाला आहे हे पाहण्यासाठी चाखून बघतो. आणि त्यानंतर तो सर्वांना सर्व्ह करतो. त्याने तयार केलेला पदार्थ चाखल्यानंतर इतर खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Rashid bhai ke haath ka khaana.... Isse kehte hai Eid manana 😍#SeasonOfFirsts #AavaDe #eidmubarak pic.twitter.com/PL0buPrElP
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 3, 2022
त्याचा हा व्हिडीओ शेअर करताना गुजरातने एक खास कॅप्शन दिली आहे. ‘राशीद भाई के हात का खाना…इसे कहते हैं ईद मनाना’ असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच संघाने दुसरा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये खेळाडू ईद निमित्त गळभेट घेताना दिसत आहे. हमारी पहिली ईद म्हणत संघाने सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
Humaari pehli Eid 💙... #SeasonOfFirsts
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 3, 2022
Gujarat Titans ki taraf se aap sabko #EidMubarak!! pic.twitter.com/odIWHUIPxQ
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखावी गुजरात टायटन्सने (GT) आतापर्यंत 9 सामन्यांत 8 सामने जिंकले आहेत. संघाचा केवळ 1 सामन्यात पराभव झाला आहे. अशाप्रकारे गुजरात टायटन्स (GT) 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, आणखी 1 सामना जिंकल्यानंतर, गुजरात टायटन्सचे (GT) प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.