Home /News /mumbai /

धक्कादायक...अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ, महिलांनी मुंबईत राहायचं तरी कसं?

धक्कादायक...अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ, महिलांनी मुंबईत राहायचं तरी कसं?

NCRB च्या आकडेवारीनुसार मुंबई महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे

    मुंबई, 16 जानेवारी : राज्य सरकारकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले असले, तरी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (2019) जाहीर केलेल्या क्राइमच्या आकडेवारीनुसार मुंबई महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. त्यांच्या कामाच्या पद्धतींबरोबरच कामाच्या वेळांमध्येही बदल झाला आहे. अनेक महिला रात्रपाळीही करतात. अशावेळी निश्चित ठिकाणी सुरक्षित पोहोचणं गरजेचं आहे. ही समाजाची जबाबदारी आहे म्हणा ना. मात्र नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या नवी आकडेवारी पाहिली तर परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. या नव्या आकडेवारीनुसार मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 560ने वाढ झाली आहे. 2019 या वर्षात विनयभंग, बलात्कार, अपहरण अशा एकूण 6438 घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या 1015 गुन्ह्यांपैकी अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांची संख्या 622 इतकी आहे.  त्यापूर्वीच्या वर्षात म्हणजे 2018 या वर्षात ही संख्या 5978 इतकी होती. 2019 या वर्षांत मुंबईत सुमारे 41,931 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यापैकी 28,802 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2018 या वर्षाशी तुलना करता बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 126 तर विनयभंगाच्या गुन्ह्यात 92 ने वाढ झाली आहे. तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढली आतापर्यंत महिलांवरील बलात्कार व विनयभंगाची तक्रार करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी होती. अनेकदा महिला समाजामध्ये प्रतिमा मलीन होईल असा विचार करुन तक्रार करीत नसत. मात्र वाढलेल्या जनजागृतीमुळे परिस्थिती बदलली आहे. आता अशा घटनांमध्ये मुलींबरोबर त्यांचे पालकही तक्रार करण्यासाठी आणि न्याय मिळविण्यासाठी पोलीस स्टेशनकडे धाव घेत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या