निवृत्तीच्या निर्णयातून U-टर्न घेणारा अंबाती रायडु झाला कर्णधार, टीम इंडियात मिळणार जागा?

निवृत्तीच्या निर्णयातून U-टर्न घेणारा अंबाती रायडु झाला कर्णधार, टीम इंडियात मिळणार जागा?

टीम इंडियासाठी क्रिकेट खेळणारा मधल्या फळीचा फलंदाज अंबाती रायडुला पुन्हा एकदा संघात सामिल होण्याची संधी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : टीम इंडियासाठी क्रिकेट खेळणारा मधल्या फळीचा फलंदाज अंबाती रायडुला पुन्हा एकदा संघात सामिल होण्याची संधी आहे. वर्ल्ड कप संघात निवड न झाल्यामुळं रागात येऊन रायडूनं क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, काही दिग्गज खेळाडूंनी समजवल्यानंतर रायडूनं हा निर्णय मागे घेतला.

दरम्यान निवृत्तीतून यु-टर्न घेतल्यानंतर रायडूकडे एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रायडुकडे हैदराबाद संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रायडु आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याआधी रायडुला चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्याच्या जागी विजय शंकरला संघात जागा देण्यात आली. त्यानंतर निवृत्तीची घोषणा केलेल्या अंबाती रायुडुनं आता यू-टर्न घेतला आहे. रायुडुनं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे सदस्य रत्नाकर शेट्टी यांना ईमेल पाठवला आहे. यात त्यानं म्हटलं आहे की, निवृत्ती घेण्याचा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला आहे. मला अजूनही क्रिकेटच्या सर्व प्रकारात खेळायचं आहे.

हैदराबाद क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता नोएल डेविड यांनी रायुडुच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी हैदराबाद क्रिकेटसाठी ही चांगली बातमी असून रायुडुमध्ये अजून पाच वर्षांचं क्रिकेट बाकी आहे असं म्हटलं. रायडुनं चांगला निर्णय घेतला असून तो युवा खेळाडूंना तयार करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. गेल्या वर्षी त्याच्याशिवाय आम्हाला रणजी ट्रॉफीमध्ये संघर्ष करावा लागला होता. रायुडुचा अनुभव संघासाठी महत्वाचा आहे. याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेलं.

वाचा-KBC मध्ये 7 कोटींसाठी स्पर्धेकाला विचारला प्रश्न, पण ट्रोल झाला सचिन

अंबाती रायुडुनं त्याचा अखेरचा प्रथम श्रेणीतला सामना नोव्हेंबर 2017 मध्ये खेळला होता. 97 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या रायुडुने भारताकडून 55 एकदिवसीय सामन्यात 1 हजार 694 धावा काढल्या आहेत. यात सर्वोच्च नाबाद 124 धावांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं पाच टी20 सामने खेळले असून 42 धावा केल्या होत्या.

वाचा-पहिल्या टी-20 सामन्याआधी चाहत्यांसाठी मोठी बातमी, असं असेल धर्मशालाचं हवामान

24 सप्टेंबरला हैदराबादचा पहिला सामना

विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद संघाचा पहिला सामना 24 सप्टेंबरला होणार आहे. कर्नाटक संघाविरोधात पहिला सामना होणार असून रायडु संघाचे नेतृत्व करणार आहे. यानंतर हैदराबादचा संघ गोवा, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, सौराष्ट्र, मुंबई आणि केरळ या संघांविरोधात भिडणार आहे.

हैदराबादचा संघ: अंबाती रायडू (कर्णधार), बी. संदीप (उप-कर्णधार), पी. अक्षत रेड्डी, तन्मय अग्रवाल, ठाकुर तिळक वर्मा, रोहित रायडु, सीव्ही मिलिंद, मेहदी हसन, साकेत साई राम, मोहम्मद सिराज, मिक्कल जायसवाल, जे. मल्लिकार्जुन (विकेटकीपर), कार्तिकेय काक, टी. रवि तेजा, अजय देव गौड.

वाचा-मुंबईकर अथर्व अंकोलेकरची 'बेस्ट' कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप

'एकच साहेब पवार साहेब', मुख्यमंत्र्यांचं असं झालं बारामतीत स्वागत, संपूर्ण VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 14, 2019, 8:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading