मुंबई, 03 जुलै : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची मैत्री भारतीय क्रिकेटमधली सर्वात जास्त चर्चेत असते. आपल्या मैत्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दोघांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तेंडुलकर आणि कांबळी या दोघांनी क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतले. दरम्यान मधल्या काही वर्षांत या दोघांमध्ये दुरावा आला होता, मात्र आता पुन्हा दोघं चांगले मित्र झाले आहेत.
दरम्यान आता फ्रेंडशीप डेचे औचित्य साधत सचिननं विनोद कांबळी सोबतचा फोटो ट्वीट केला आहे. सचिननं कांबळी सोबतचा आपल्या शालेय जीवनातील एक फोटो शेअर केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सचिननं हा फोटो शेअर करत, "कांबळ्या शालेय दिवसातील या फोटो मला मिळाला आहे. जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत, म्हणून हा फोटो पुन्हा टाकतोय", असे कॅप्शन लिहिले आहे. शालेय क्रिकेटमध्ये सचिन आणि कांबळी यांच्या जोडीनं नाबाद 664 धावांची भागिदारी केली होती, जो एक रेकॉर्ड झाला होता.
वाचा-IND vs WI : रोहित शर्मा आज मोडणार टी-20च्या इतिहासातला सर्वात मोठा रेकॉर्ड!
Kamblya, found this photo of ours from our school days. Memories came rushing back and thought of sharing this. pic.twitter.com/pUkOablTAX
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 3, 2019
वाचा-IND vs WI : विराटची चिंता वाढली, धवन की राहुल कोणाला देणार संघात स्थान?
दरम्यान फ्रेंडशीप डे दिवशी विनोद कांबळी दरवर्षी सचिन तेंडुलकरसाठी एक खास मेसेज लिहितो. सचिन आणि कांबळी यांच्यात 2009मध्ये दुरावा आला होता, जेव्हा एका टीव्ही शोमध्ये कांबळीनं सचिननं मला क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी मदत केली नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर तब्बल 8 वर्षांनी 2017मध्ये यांच्यातील दुरावा मिटला.
वाचा- IND vs WI : भारत-वेस्ट इंडिज आज भिडणार, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच
काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sachin tendulkar, Vinod kambli