IND vs WI : विराटची चिंता वाढली, धवन की राहुल कोणाला देणार संघात स्थान?

India vs West Indies भारताकडून मधल्या फळीत आणि सलामीला फलंदाजीसाठी कोण येणार हे प्रश्न मात्र कायम आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 10:28 AM IST

IND vs WI : विराटची चिंता वाढली, धवन की राहुल कोणाला देणार संघात स्थान?

फ्लोरिडा, 03 ऑगस्ट: India vs West Indies यांच्यात आज पहिला टी-20 सामना होणार आहे. वर्ल्ड कप दरम्यान केलेल्या चूका दुरुस्त करण्याची संधी असणार आहे. यात मधल्या फळीत आणि सलामीला फलंदाजीसाठी कोण येणार हे प्रश्न मात्र कायम आहेत. यात शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यात स्पर्धा लागली आहे. वर्ल्ड कपमध्ये दुखापतींमुळे माघार घेतलेल्या शिखर धवनच्या जागी केएल राहुलला संधी देण्यात आली होती. मात्र, आता धवननं कमबॅक केल्यानंतर रोहित शर्मासोबत फलंदाजीला कोण उतरणार हा प्रश्न कायम आहे.

गेल्या काही दिवसांपासून संघात दोन गट असल्याच्या चर्चा होत होत्या. यात कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या बातम्या होत्या. असे असले तरी वर्ल्ड कपमध्ये 5 शतक लगावणाऱ्या रोहित शर्माची जागा पक्की आहे. त्यामुळं आता रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

वाचा-वेस्ट इंडिजला मोठा झटका, 'हा' टी-20 किंग संघाबाहेर!

शिखर धवन सलामीसाठी योग्य

वर्ल्ड कपमध्ये शिखर धवननं केवळ दोन सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात शिखरनं 117 धावांनी शतकी खेळी केली होती, याच सामना दरम्यान धवन जखमी झाला होता. त्यामुळं धवनच्या जागी केएल राहुलला संघात स्थान देण्यात आले. वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनल सामन्यापर्यंत राहुल रोहितसोबत सलामीला उतरला होता. मात्र, धवननं आयपीएलमध्ये सलामीला फलंदाजी केली होती. दिल्ली कॅपिटल्सकडून 16 सामन्यात 521 धावा केल्या होत्या. यात त्यानं 97 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.

Loading...

आयपीएलमध्ये राहुल टॉप

केएल राहुलने आयपीएलमध्ये या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. 14 सामन्यात त्यानं 593 धावा केल्या होत्या. यात नाबात एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माला चांगली साथ दिली. श्रीलंकेविरोधात राहुलनं वर्ल्ड कपमधले पहिले शतक ठोकले.

कोहली कोणत्या क्रमांकावर करणार फलंदाजी?

भारताचे तीन सलामीचे फलंदाज चांगले फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं विराटला संघ निवडणे कठिण जाणार आहे. त्यामुळं शिखर आणि रोहित सलामीला उतरू शकतात. तर, विराट किंवा राहुल तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.

वाचा-विराटच्या 'टीम'मध्ये रोहित नाही, ट्वीटनंतर पुन्हा मतभेदाची चर्चा!

#MumbaiRains VIDEO: पावसाचं रौद्र रुप; ठाण्यात रस्ते, रेल्वे पाण्याखाली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...