फ्लोरिडा, 03 जुलै : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आज वेस्ट इंडिज विरोधात टी-20 सामना खेळणार आहे. या मालिकेतील दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात होणार आहे. ही मालिका टी-20 वर्ल्ड कप 2020च्या दृष्टीने भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि खलील अहमद यांना संधी मिळू शकतो. वेस्ट इंडिज ‘अ’ विरोधात झालेल्या मालिकेत या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्यांची सिनिअर संघात निवड झाली. गोलंदाजीमध्ये राहुल चहर आणि नवदीप सैनी यांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. निवड समितीनं भुवनेश्वर कुमार वगळता इतर वरिष्ठ गोलंदाजांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंकडे स्वत:ला सिध्द करण्याची एक संधी असेल. वाचा- IND vs WI : विराटची चिंता वाढली, धवन की राहुल कोणाला देणार संघात स्थान? दुसरीकडे कार्लोस ब्राथवेटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघांत केरन पोलार्ड, सुनील नरेन आणि आंद्र रसेल यांसारखे वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू आहेत. तर, गोलंदाजीमध्ये वेस्ट इंडिजकडे शेल्डन कॉट्रेल आणि ओशेन थॉमस यांसारखे खेळाडू आहेत. वाचा- वेस्ट इंडिजला मोठा झटका, ‘हा’ टी-20 किंग संघाबाहेर! येथे पाहू शकता India vs West Indies यांच्यातील पहिला टी-20 सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे. हा सामना अमेरिकेतील फ्लोरिडाच्या ब्रोवार्ड काऊंटी मैदानावर होणार आहे. वाचा- 5 वर्षांनंतर भारताकडे अशी असेल फलंदाजांची फौज! काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







