मुंबई, 2 एप्रिल : कतारमध्ये या वर्षाच्या शेवटी फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा (FIFA World Cup 2022) होणार आहे. या स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला आहे. यामध्ये 2010 चा विजेता स्पेन (Spain) आणि 2014 ची चॅम्पियन जर्मनी (Germany) यांचा एकाच गटात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही टीम ग्रुप ई मध्ये आहेत. त्यामुळे या ग्रुपमधील लढतींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यजमान कतारचा नेदरलँड्ल, सेनेगल आणि इक्वाडोर यांच्यासह ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. गतविजेत्या फ्रान्सचा ग्रुप डीमध्ये समावेश आहे. फुटबॉल वर्ल्ड कपसाठी 36 वर्षांनी पात्र होणाऱ्या कॅनडाचा समावेश क्रोएशिया, बेल्जियम आणि मोरक्कोसोबत ग्रुप एफमध्ये करण्यात आला आहे. तर अर्जेंटीना आणि मेक्सिको या दक्षिण अमेरिका खंडातील दोन टीम ग्रुप सी मध्ये एकत्र आहेत. 3 टीम अनिश्चित 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेतील 3 टीम अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. जून महिन्याच्या शेवटी युरोपीयन क्वालिफायर आणि अन्य स्पर्धा झाल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व 32 टीम निश्चित होतील. या टीमची विभागणी 8 गटांमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 4 टीम आहेत. सर्व गटातील टॉप 2 टीम बाद फेरीसाठी पात्र होतील. MI vs RR : मुंबईची टीम झाली भक्कम तर राजस्थानचा स्टार बॉलर जखमी, वाचा दोन्ही टीमची संभाव्य Playing 11 फिफा वर्ल्ड कप 2022 संपूर्ण ड्रॉ ग्रुप ए: कतार, इक्वाडोर, सेनेगल, नेदरलँड्स ग्रुप बी: इंग्लंड, इराण, अमेरिका, यूरो प्ले ऑफ (वेल्स/ स्कॉटलँड/ यूक्रेन) ग्रुप सी: अर्जेंटीना, मेक्सिको, पोलंड, सौदी अरेबिया ग्रुप डी: फ्रान्स, आईसी प्लेऑफ 1 (पेरू/ यूएई/ ऑस्ट्रेलिया), डेन्मार्क, टयूनिशिया ग्रुप ई: स्पेन, जर्मनी, जापान, कोस्टा रिका/ न्यूजीलँड ग्रुप एफ: बेल्जियम, क्रोएशिया, मोरक्को, कॅनाडा ग्रुप जी: ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, क्रोएशिया ग्रुप एच: पोर्तूगाल, घाना, उरुग्वे, दक्षिण कोरिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.